जीन्स घालून 'या' देशात गेल्यास खावी लागेल तुरूंगाची हवा, फॅशनवर पूर्णपणे बंदी; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 15:19 IST2025-07-17T15:18:35+5:302025-07-17T15:19:18+5:30
Wearing Jeans Is Crime: विचार करा की, निळी जीन्स घालून रस्त्यानं जात असताना पोलिसांनी तुम्हाला पकडलं तर...? आता तुम्ही म्हणाल की, निळी जीन्स घातल्यानं पोलीस कशाला पकडतील?

जीन्स घालून 'या' देशात गेल्यास खावी लागेल तुरूंगाची हवा, फॅशनवर पूर्णपणे बंदी; कारण...
Wearing Jeans Is Crime: निळी जीन्स घालणं आजकालची मोठी फॅशन आहे. महिला असो वा पुरूष निळी जीन्स आवडीनं घालतात. पण विचार करा की, निळी जीन्स घालून रस्त्यानं जात असताना पोलिसांनी तुम्हाला पकडलं तर...? आता तुम्ही म्हणाल की, निळी जीन्स घातल्यानं पोलीस कशाला पकडतील? पण ही काही गंमत नाहीये. उत्तर कोरियात हे वास्तव आहे. उत्तर कोरियामध्ये निळी जीन्स घालणं गुन्हा आहे. निळी जीन्स घालणाऱ्या व्यक्तीला मोठा दंड भरावा लागतो किंवा त्याला तुरूंगवासाची शिक्षाही होऊ शकते.
उत्तर कोरियातील हुकूमशहा किम जोंग उन अमेरिकेचा किंवा पाश्चिमात्य गोष्टींची कट्टर विरोधक आहे. त्याचं मत आहे की, निळी जीन्स अमेरिकेची संस्कृती आणि साम्राज्यवादाचं प्रतीक आहे. त्यामुळे निळी जीन्स घालणं देशद्रोह आहे. ही बंदी केवळ कपड्यांपुरती मर्यादीत नाही तर पूर्ण विचारधारेवरील आहे.
अजून कशावर बंदी?
उत्तर कोरियात केवळ निळ्या जीन्सवरच नाही तर वेगवेगळ्या गोष्टींवर बंदी आहेत. ज्यात वेस्टर्न लोगो असलेली टी-शर्ट, लेदर जॅकेट, केसांना कलर करणे, बॉडी पियर्सिंग, मॉडर्न फॅशन स्टाईल यावर बंदी आहे. या गोष्टींकडे अमेरिकेच्या प्रभावाशी जोडून बघितलं जातं.
उत्तर कोरियामध्ये फॅशन पोलीस नावाचं विशेष टीम असते. ज्यांचं काम हे बघणं असतं की, लोक नियमांचं पालन करत आहे की नाही हे बघणं. जर कुणी नियमांचं उल्लंघन करत असेल तर त्याना लगेच शिक्षा दिली जाते. पोलिसांना पूर्ण समाजाला एकसारखं बघण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
उत्तर कोरियात लोक सरकारकडून ठरवण्यात आलेले कपडे आणि हेअरस्टाईल फॉलो करतात. इतकंच नाही तर कोणत्या रंगाचे कपडे घालायचे हेही सरकार सांगतं. येथील लोकांचे विचार आणि व्यवहारावर पूर्णपणे नियंत्रण आहे.