खोदकाम करताना सापडली ५०० वर्ष जुनी मानवी हाडांची भिंत, संशोधकही झाले हैराण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 14:46 IST2020-02-18T14:38:43+5:302020-02-18T14:46:20+5:30
हाडांपासून तयार केलेल्या भिंतीत जास्तीत जास्त हाडे ही वयस्कांची वाटत आहेत. इतकेच नाही तर यात काही मानवी कवट्याही आहेत.

खोदकाम करताना सापडली ५०० वर्ष जुनी मानवी हाडांची भिंत, संशोधकही झाले हैराण!
जगाच्या कानाकोपऱ्यात ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी वेगवेगळं संशोधन सतत सुरू असतं. अशीच एक आश्चर्यजनक गोष्ट वेस्टर्न यूरोपच्या बेल्जिअनमध्ये संशोधकांना मानवी हाडांपासून तयार केलेली एक भिंत सापडली आहे. खोदकाम करताना त्यांना ही भिंत सापडली. आणखी एक आश्चर्याची बाब म्हणजे ही भिंत त्यांना एका चर्चजवळ सापडली आहे.
Foxnews ने दिलेल्या वृत्तानुसार, हाडांपासून तयार केलेली ही भिंत १७व्या शतकाच्या आसपासची सांगितली जात आहे. या संशोधन टीमचे मुख्य Janiek De Gryse यांनी सांगितले की, हाडांपासून तयार केलेल्या भिंतीत जास्तीत जास्त हाडे ही वयस्कांची वाटत आहेत. इतकेच नाही तर यात काही मानवी कवट्याही आहेत.
Janiek यांनी सांगितले की, ही सर्व हाडे Saint-bavo चर्चच्या स्मशानभूमीत मिळाली आहेत. आता यावर आणखी संशोधन केलं जाईल. असेही मानले जात आहे की, हे ठिकाण जवळपास १ हजार वर्ष जुनं आहे.
आता ही हाडे भिंतीतून काढली जात आहेत. नविन कबरींसाठी जागा निर्माण करण्यासाठी असं केलं जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पोलंडमध्ये ४० सांगाडे सापडले होते, ज्यांचे हात बांधलेले होते. हे सांगाडे ११व्या शतकातील असल्याचे बोलले जात आहे.