शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

रेस्टॉरंटमध्ये काहीवेळा आवडीची जागा का मिळत नाही? वेट्रेसने केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 19:56 IST

अनेकदा तुम्हाला तुमच्या आवडीच्या जागी बसू दिलं जातं. तर काही वेळा असंही होऊ शकतं की ती जागा रिकामी असूनही तुम्हाला तिथे बसू दिलं जात नाही. कधी तुम्ही याचा विचार केला आहे का की तुम्हाला तुमच्या आवडीचा टेबल का दिला गेला नाही? ग्राहकांना टेबल अलॉट  करण्याबाबत नुकतंच अमेरिकेतील एका वेट्रेसने (American Waitress) धक्कादायक खुलासा केला आहे.

तुम्ही जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला जात असाल तेव्हा आपल्या आवडीचा टेबल मिळावा (Favorite Table at Restaurant) यासाठी तेथील कर्मचाऱ्यांसोबत बोलत असाल. अनेकदा तुम्हाला तुमच्या आवडीच्या जागी बसू दिलं जातं. तर काही वेळा असंही होऊ शकतं की ती जागा रिकामी असूनही तुम्हाला तिथे बसू दिलं जात नाही. कधी तुम्ही याचा विचार केला आहे का की तुम्हाला तुमच्या आवडीचा टेबल का दिला गेला नाही? ग्राहकांना टेबल अलॉट  करण्याबाबत नुकतंच अमेरिकेतील एका वेट्रेसने (American Waitress) धक्कादायक खुलासा केला आहे.

लॉस एंजेल्सची (Los Angeles) टिकटॉकर ब्रूक स्कोफील्डमध्ये (Brooke Schofield) एका रेस्टॉरंटमध्ये काम करते. टिकटॉकवर @brookeschofield1 नावाचं तिचं अकाऊंट अतिशय लोकप्रिय आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ब्रूकने नुकतंच एक व्हिडिओ शेअर केला असून यात तिनं थक्क करणारा खुलासा केला. ब्रूक एका रेस्टॉरंटमध्ये काम करते. तिनं व्हिडिओमध्ये सांगितलं, की तिचा बॉस नेहमी तिला सांगत असे की रेस्टॉरंट मध्ये येणाऱ्यांमध्ये जे दिसायला चांगले नसतील त्यांना मागील बाजूचे टेबल द्यायचे आणि जे सुंदर असतील त्यांना दरवाजाशेजारचे किंवा खिडकीजवळचे टेबल द्या. हे समजल्यावर अनेक लोक हैराण झाले.

लोकांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहींनी म्हटलं की लोकांसोबत अशाप्रकारे भेदभाव करणं चुकीचं आहे. तर काहींनी या पॉलिसीची थट्टा उडवली आहे. एका व्यक्तीनं म्हटलं, की मी इतका खास आहे की माझ्यासाठी तर पूर्ण रेस्टॉरंटच रिकामं केलं जाईल. आणखी एकानं कमेंट करत सांगितलं, की एकदा मी माझ्या कुटुंबीयांसोबत रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो, तेव्हा आम्हाला बेसमेंटमध्ये बसवण्यात आलेलं. आणखी एका व्यक्तीनं कमेंट करत सांगितलं की तो ज्या रेस्टॉरंटमध्ये काम करतो, तिथे विंडो सीट केवळ मॉडेलप्रमाणे दिसणाऱ्यांनाच दिली जाते. काही रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांनी या तरुणीला चुकीचं ठरवत सांदितलं की असा भेदभाव प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये होत नाही.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके