शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

ओ माय गॉड! 90 हजारांच्या स्कूटीसाठी 1.12 कोटींचा VVIP नंबर, हिमाचल प्रदेशातील प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 21:51 IST

VVIP Number plate: हिमाचलमध्ये VVIP नंबरसाठी कोट्यवधी रुपये मोजण्यात आले, जाणून घ्या नंबर काय आहे..?

Most expensive scooter number: आपली कार किंवा बाईक इतरांपेक्षा वेगळी बनवण्यासाठी काही लोक त्यात बदल करतात, तर काही व्हीआयपी नंबर ठेवण्यास प्राधान्य देतात. पण काही वेळा लोक आपली हौस भागवण्यासाठी इतके पैसे खर्च करतात, की ते ऐकल्यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. हिमाचल प्रदेशातही असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे एका स्कूटीच्या व्हीव्हीआयपी क्रमांकासाठी 1 कोटींहून अधिक बोली लावण्यात आली. हिमाचल प्रदेशच्या इतिहासात पहिल्यांदाच स्कूटी मालक दुचाकीसाठी एवढ्या मोठ्या रकमेत नंबर खरेदी करण्यास तयार आहे.

हे प्रकरण शिमल्यातील कोटखाईचे आहे, जिथे विभागाने दुचाकींसाठी व्हीव्हीआयपी क्रमांक (HP99-9999) साठी ऑनलाइन बोली लावली होती. या क्रमांकाची किमान किंमत 1,000 रुपये निश्चित करण्यात आली असून एकूण 26 जणांनी त्यासाठी बोली लावली. दुपारी 1.30 वाजेपर्यंत बोली सुरू होती, मात्र बोली 1,12,15,500 रुपयांपर्यंत वाढत गेली. ही बोली पाहून सर्वांनाच धक्का बसला.

बिडिंगची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि युजर्सनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली. एका युजरने असा अंदाज लावला की, बोली लावणाऱ्याला या वर्षी सफरचंदाचा हंगाम चांगला गेला असावा. दुसर्‍या युजरने बोलीच्या रकमेवर आश्चर्य व्यक्त केले आणि सुचवले की बोली लावणार्‍याने नंतर नंबर खरेदी करण्यास नकार दिल्यास दंड केला पाहिजे. तसेच, निविदाधारकांच्या निधीचा स्रोत तपासला पाहिजे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेHimachal Pradeshहिमाचल प्रदेशAutomobileवाहन