काय होतास तू काय झालास तू, लॉकडाऊनमध्ये विराट कोहलीची झाली अशी अवस्था, एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 12:19 IST2020-05-21T12:19:09+5:302020-05-21T12:19:53+5:30

विराट कोहलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान हिट ठरतो आहे. गेल्या काही तासातच या व्हिडीओला लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

Virat Kohli Turns ‘Dinosaur’ In Hilarious New Anushka Sharma Video | काय होतास तू काय झालास तू, लॉकडाऊनमध्ये विराट कोहलीची झाली अशी अवस्था, एकदा पाहाच

काय होतास तू काय झालास तू, लॉकडाऊनमध्ये विराट कोहलीची झाली अशी अवस्था, एकदा पाहाच

लॉकडाऊनमुळे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या आपल्या लेडी लव्ह अनुष्कासोबत घरा बंदिस्त आहे. लॉकडाऊनमध्ये दोघांना एकमेकांना पुरेसा वेळ देणे शक्य झाले आहे. विराटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यापूर्वी कधीही न पाहिलेला त्याचा अंदाज व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला आहे. मिळालेला वेळ अजून मेजशीर व्हावा यासाठी विराट चक्क डायनॉसोरप्रमाणे घरात वावरताना पाहायला मिळतोय. व्हिडीओत त्याचा मेजशीर अंदाज पाहून चाहतेही रिफ्रेश होत आहेत. एरव्ही अनुष्का तिचे लॉकडाऊन रूटीनचे व्हिडीओ चाहत्यांसह शेअर करत वाहवा मिळवायची आता विराटही तिच्याच पाऊलावर पाऊल टाकत चाहत्यांचे अशाप्रकारे मनोरंनज करताना पाहायला मिळतो आहे.हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान हिट ठरतो आहे. गेल्या काही तासातच या व्हिडीओला लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.


अनुष्का शर्माचा भाऊ कर्नेश शर्माने यावर कमेंट करत लिहीले की,"हे लॉकडाउन सर्व प्रकारच्या प्राण्यांना बाहेर आणत मोकळेपणाने जगण्याचा आनंद देणारा आहे ". त्यांच्याशिवाय बॉलिवूड अभिनेता करण वाहीने हसणार्‍या एमोजी शेअर करत व्हिडीओला पसंती दिली आहे. त्यावर विराटनेही उत्तर देत म्हटले आहे की, 'तुझे बड़ी हंसी आ रही है साले...' तर रणवीर सिंगने देखील हा व्हिडीओ पाहताच, आजपर्यंत मी इतका क्युट व्हिडीओ पाहिला नसल्याचे त्याने म्हटले आहे.

तर यात अनुष्का शर्माची कमेंटने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने म्हटले की, माझ्या घरात डायनॉसोरला पाहिला, हे वाचून अनेकजण हसून हसून लोटपोट होत आहेत.

Web Title: Virat Kohli Turns ‘Dinosaur’ In Hilarious New Anushka Sharma Video