viral video : जिममध्ये वर्कआऊट करताना तरुणीने ट्रेडमिलवर केला भन्नाट डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 14:55 IST2018-05-30T14:48:53+5:302018-05-30T14:55:42+5:30
सोशल मीडियावर सध्या एका तरुणीचा ट्रेडमिलवर केलेला भन्नाट डान्स व्हायरल होत आहे.

viral video : जिममध्ये वर्कआऊट करताना तरुणीने ट्रेडमिलवर केला भन्नाट डान्स
नवी दिल्ली - तुम्ही जिममध्ये व्यायाम करताना, ट्रेडमिलवर धावताना अनेकांना पाहिले असेल. पण तुम्ही कधी कुणाला ट्रेडमिलवर नाचताना पाहिलंय का. नाही ना. कारण असं करणं खूप कठीण आहे. मात्र अशक्य नाही. कारण सोशल मीडियावर सध्या एका तरुणीचा ट्रेडमिलवर केलेला भन्नाट डान्स व्हायरल होत आहे.
फेसबूकवरील मेरा पंजाब नामक एका फेसबूक पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी गाण्याच्या तालावर नासताना आणि ट्रेडमिलवर थरारक कसरती करताना दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून, हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे.
मात्र या व्हिडिओत दिसत असलेली तरुणी प्रशिक्षित आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी अशाप्रकारची कसरत करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे तुम्हीही अशी जिवघेणी कसरत कण्यापासून दूर राहा.