Video: बेशुद्ध होऊन रेल्वे ट्रॅकवर पडला होता 'तो', काही सेकंदाच्या अंतरावर होता मृत्यू अन् तेव्हाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 16:44 IST2021-08-20T16:41:52+5:302021-08-20T16:44:04+5:30
न्यूयॉर्क सिटी पोलीस डिपार्टमेंट द्वारे जारी करण्यात आलेल्या एका व्हिडीओत ब्रोंक्समध्ये एक व्यक्ती मेट्रो ट्रॅकवर पडलेला दिसला होता.

Video: बेशुद्ध होऊन रेल्वे ट्रॅकवर पडला होता 'तो', काही सेकंदाच्या अंतरावर होता मृत्यू अन् तेव्हाच
सोशल मीडियावर एक रेस्क्यू व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक पोलीस अधिकारी आणि एका व्यक्तीने अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील एका स्टेशनवर मेट्रोच्या रूळावर पडलेल्या व्यक्तीचा जीव वाचवला. मेट्रो येण्याच्या काही सेकंदाआधी दोन लोकांनी आपला जीव धोक्यात टाकून चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीला सुखरूप रेल्वे ट्रॅकवरून बाहेर काढलं.
न्यूयॉर्क सिटी पोलीस डिपार्टमेंट द्वारे जारी करण्यात आलेल्या एका व्हिडीओत ब्रोंक्समध्ये एक व्यक्ती मेट्रो ट्रॅकवर पडलेला दिसला होता. अशात मेट्रो येणार इतक्यात तिथे तैनात एका पोलीस अधिकाऱ्याने त्या खाली पडलेल्या व्यक्तीला वाचवण्याचा ट्रॅकवर उडी घेतली. त्यानंतर एक प्रवासीही त्याच्या मदतीसाठी खाली गेला.
एजन्सीने क्लीप ऑनलाइन शेअर करत लिहिले की, 'NYPD पोलीस कोणत्याही स्थितीत न्यूयॉर्कच्या लोकांची मदत करते'. ते म्हणाले की, ती व्यक्ती बेशुद्ध झाली होती आणि चक्कर येऊन मेट्रो ट्रॅकवर पडली होती. ते म्हणाले की 'आम्ही त्या व्यक्तीचे आभारी आहोत ज्याने मदत केली'.
६० वर्षीय व्यक्तीला वाचवण्यासाठी खाली उडी घेणाऱ्या NYPD अधिकारी लुडिन लोपेजने CBS2 ला सांगितलं की, मेट्रो बस एक मिनिटाच्या अंतरावर होती. व्हिडीओत बघू शकता की, मेट्रोचा लाइट जवळ येताना दिसत आहे. पण सुदैवाने त्या व्यक्तीला वेळेवर वाचवण्यात आलं.