VIDEO: हा ट्रक आहे की मोटारसायकल? अजब 'जुगाड' पाहून तुम्हीही व्हाल चकीत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 18:43 IST2021-10-31T18:42:20+5:302021-10-31T18:43:46+5:30
आतापर्यंत 63 लाखांहून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहिला गेलाय.

VIDEO: हा ट्रक आहे की मोटारसायकल? अजब 'जुगाड' पाहून तुम्हीही व्हाल चकीत...
सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हिडिओ व्हायरल(Viral Video) होत असतात. यात अनेक मजेशीर आणि तितकेच चकीत करणारे व्हिडिओही असतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हडिओ पाहून लोकांनाही त्यावर विश्वास बसणे अवघड झाले आहे. हा व्हिडिओ आहे एका मोटारसायकलपासून तयार केलेल्या ट्रकचा.
सोशल मीडिआवर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झालेत. कारण, या व्हिडिओत एक मोटारसायकल दिसतीये. पण, या मोटारसायकलला पाठीमागे एक भलामोठा ट्रकचा भाग जोडण्यात आलाय आणि त्यात भरगच्च माल भरण्यात आला आहे. ही अजब मोटारसायकल पाहून तुम्हीही काही काळ चक्रावून जाल.
The little engine that could. 😳😬😂 pic.twitter.com/U5DtnXQdbX
— Fred Schultz (@fred035schultz) October 29, 2021
हा व्हिडिओ @fred035schultz नावाच्या ट्विटर यूजरने शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 63 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओमध्ये एक ट्रक रस्त्यावरून जात असल्याचे दिसत आहे. पण, या ट्रकला चक्क एक मोटारसायकल खेचतीये. या अजब वाहनाला ट्रक म्हणावं की बाईक हेही नेटकऱ्यांना समजत नाहीय.