शाब्बास! १२ वर्षांच्या चिमुरड्यानं शेअर बाजारात लावला पैसा; वर्षभरातच झाला ४३ टक्के फायदा, जाणून घ्या कसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 19:09 IST2021-02-10T19:01:42+5:302021-02-10T19:09:56+5:30
Trending Viral News in Marathi : आपल्या आईकडे हट्ट् करून या मुलानं एक रिटेल ट्रेडिंग अकाऊंट ओपन करून घेतलं आहे.

शाब्बास! १२ वर्षांच्या चिमुरड्यानं शेअर बाजारात लावला पैसा; वर्षभरातच झाला ४३ टक्के फायदा, जाणून घ्या कसा
(Image Credit- Aajtak)
११ ते १२ वर्षांची मुलं शाळा आणि क्लासेसच्या अभ्यासात गुंतलेली दिसून येतात. मुलं कॉलेजला जायला लागतात तरी त्यांना शेअर मार्केटबाबत फारचं काही माहित नसतं. कारण त्यांचा जवळचा संबंध आलेला नसतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा मुलाबद्दल सांगणार आहोत. ज्यानं १२ वर्षांच्या वयात शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले आहेत. आपल्या आईकडे हट्ट् करून या मुलानं एक रिटेल ट्रेडिंग अकाऊंट ओपन करून घेतलं आहे.
इतकंच नाही तर त्यानं मार्केटमध्ये १६ लाख रूपये गुंतवण्यासाठी आपल्या कुटुंबाला तयार केलं आहे. रॉयर्टसच्या रिपोर्टनुसार या मुलानं वर्षभरात ४३ टक्के फायदा मिळवला आहे. हा मुलगा साऊथ कोरियाचा रहिवासी असून याचं नाव क्वन जून आहे. वॉरेन बफे बनण्याची त्याची इच्छा आहे. दरम्यान वॉरेन बफे सध्याच्या घडीला सगळ्यात श्रीमंत माणसांमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. तसंच शेअर मार्केटमध्ये विख्यात आहेत.
क्वन जूनने मेमोरी चिप तयार करणारी जगातील सगळ्यात मोठी कंपनी ककाओ कॉर्पस सॅमसंग आणि ह्यूडई मोटारसह अन्य कंपन्यांमध्ये पैसै लावले आहेत. १० ते २० वर्षांसाठी पैसै लावण्याचा त्याचा विचार आहे. जेणेकरून जास्तीत जास्त नफा मिळवता येऊ शकतो.अमेरिकन सैनिकानं चोरली होती हिटलरची पर्सनल टॉयलेट सीट; आता 'एवढ्या' रुपयांना झाला लिलाव
जून हा कमी वयात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारा एकटा मुलगा नाही. दरम्यान जूनच्या या यशामागे त्याच्या आईचे खूप मोठे योगदान आहे. कारण फक्त अभ्यासावर भर देण्याऐवजी त्याची आई आवड आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला मदत करत आहे. अरे देवा! हेअर स्प्रे संपला म्हणून या बाईनं डोक्याला ग्लू लावला; अन् मग झाली 'अशी' अवस्था...