Viral News: तेलाचे इंजेक्शन घेऊन तरुणाने बनवली बॉडी, नंतर झाली अशी अवस्था...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 21:12 IST2022-02-28T21:06:20+5:302022-02-28T21:12:09+5:30
बॉडी बिल्डिंगची आवड असणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

Viral News: तेलाचे इंजेक्शन घेऊन तरुणाने बनवली बॉडी, नंतर झाली अशी अवस्था...
सध्या तरुणांमध्ये बॉडी बिल्डिंगची क्रेझ खूप वाढली आहे. यासाठी अनेकजण जिममध्ये अनेक तास घाम गाळतात आणि नियमित पौष्टिक आहार घेतात. पण, काही जणांना शॉर्टकट मार्गाने लवकरात लवकर बॉडी बनवायची असते. यासाठी नको ती औषधे आणि इतर गोष्टींचे सेवन करतात. पण, याचा नंतर गंभीर परिणाम भोगावा लागू शकतो. अशीच एक घटना या तरुणासोबत घडली आहे.
'डेली स्टार'च्या बातमीनुसार, रशियामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने टिकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून आपली अवस्था लोकांसोबत शेअर केली आहे. या व्यक्तीने बॉडी बिल्डिंगसाठी चुकीच्या पद्धतीचा वापर केला आणि नंतर भलतंच होऊन बसलं. आता हा तरुण इतरांना त्याच्या मार्गावर न चालण्याचा सल्ला देतो.
नेमकं काय झालं?
किरिल तेरेशिन असे या 25 वर्षीय तरुणाचे नाव असून त्याने शरीर बनवण्यासाठी शरीरात तेलाचे(सिंथॉल ऑईल) इंजेक्शन टोचले. त्यानंतर जे घडले ते खूपच भयानक होते. बॉडीबिल्डरने 2020 मध्ये ऑईल इंजेक्शन घेतले, पण नंतर एके दिवशी खेळाच्या मैदानात त्याच्या हाताला दुखापत झाली आणि शस्त्रक्रिया करावी लागली.
स्नायूंमध्ये तेलाचे इंजेक्शन घेतले
किरीलने घेतलेल्या तेलाच्या इंजेक्शन्समुळे त्याच्या बायसेप्सला मोठी सूज येऊन चरबी वाढून फुगा तयार झाला. एके दिवशी हा फुगा फुटला आणि त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. बॉडी बिल्डिंग सारख्या गंभीर खेळामध्ये घेतलेला शॉर्टकटची त्याला खूप मोठी शिक्षा भोगावी लागली.