नवरीचा 'तो' Video पाहून नवरदेवाच्या पायाखालची जमीन सरकली; लग्नादिवशीच वेगळं झालं कपल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 17:04 IST2022-03-05T17:00:46+5:302022-03-05T17:04:17+5:30
कपल आपल्या लग्नाच्या दिवशीच एकमेकांपासून वेगळे झाल्याचं आता समोर आलं आहे.

नवरीचा 'तो' Video पाहून नवरदेवाच्या पायाखालची जमीन सरकली; लग्नादिवशीच वेगळं झालं कपल
प्रत्येकासाठी आपल्या लग्नाचा दिवस हा अत्यंत खास असतो. लोक आपल्या लग्नासाठी वेगवेगळी तयारी करताना दिसतात, जेणेकरून हा दिवस अधिक स्पेशल बनवता येईल. मात्र विचार करा, की लग्नाच्या दिवशीच काहीतरी घटना घडली आणि नवरदेव-नवरी वेगळे झाले तर? नक्कीच ही सर्वांसाठीच धक्कादायक बाब असेल. पण अशीत एक घटना एका कपलसोबत घडली आहे. हे दोघंही आपल्या लग्नाच्या दिवशीच एकमेकांपासून वेगळे झाल्याचं आता समोर आलं आहे.
ट्विटरवर सध्या एका महिलेची पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. महिलेने या विचित्र घटनेबद्दल यामध्ये सांगितलं आहे. महिलेच्या पोस्टवरुन ही बातमी केली गेली आहे. ही एक व्हायरल पोस्ट आहे, जी सध्या चांगलीच चर्चेत आहे. पोस्टमध्ये महिलेने सांगितलं की एका व्यक्तीने आपल्या होणाऱ्या पत्नीचा व्हिडीओ पाहून लग्नाच्या दिवशीच तिच्यासोबत असलेलं नातं तोडलं.
महिलेनं लिहिलं की नवरदेवाला नवरीच्या बहिणीने लग्नाच्या दिवशीच एक व्हिडीओ पाठवला. हा व्हिडिओ नवरीच्या बॅचलर पार्टीचा होता. व्हिडिओमध्ये नवरी एका पुरूष स्ट्रीपरसोबत अश्लील कृत्य करताना दिसत होती. हे पाहून नवरदेवाच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर लगेचच त्याने हे नातं तोडण्याचा निर्णय घेतला. महिलेची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. आतापर्यंत याला 41 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. इतकंच नाही तर यावर 1 हजारहून अधिकांनी कमेंटही केल्या आहेत.
अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत आश्चर्य़ व्यक्त केलं आहे. एकाने लिहिलं, की महिलेनं लगेचच आपल्या बहिणीसोबतचं नातं तोडायला हवं. दुसऱ्या व्यक्तीने लिहिलं की जर दोन लोक एकमेकांवर प्रेम करत असतील आणि त्यांना लग्न करायचं असेल तर लग्नाच्या आधी त्यांनी असं काहीच करू नये. आणखी एकाने लिहिलं, की नवरीची चूक होतीच, मात्र तिच्यापेक्षाही चुकीची तिची बहीण होती. अनेकांनी महिलेची बाजू घेत म्हटलं की लग्नाआधीच्या बॅचलर पार्टीमध्ये जे काही होतं, ते तेव्हाच विसरून जायचं असतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.