VIRAL : आयुष्यातील पहिलीच नोकरी अन् अवघ्या तीन तासांनंतरच दिला राजीनामा! असं नेमकं झालं काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 16:05 IST2025-11-18T16:05:24+5:302025-11-18T16:05:45+5:30
पहिल्या 'वर्क फ्रॉम होम' नोकरीत रुजू झाल्यानंतर केवळ तीन तासांच्या आतच या जेन झीने कर्मचाऱ्याने राजीनामा दिला.

VIRAL : आयुष्यातील पहिलीच नोकरी अन् अवघ्या तीन तासांनंतरच दिला राजीनामा! असं नेमकं झालं काय?
आजकाल तरुणांमध्ये नोकरी बदलण्याची प्रवृत्ती वाढलेली दिसते, पण एका जेन झीने कर्मचाऱ्याने तर हद्दच केली. पहिल्या 'वर्क फ्रॉम होम' नोकरीत रुजू झाल्यानंतर केवळ तीन तासांच्या आतच या तरुणाने राजीनामा दिला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर समोर आलेल्या या अजब राजीनाम्याच्या कथेने इंटरनेटवर एकच खळबळ माजवली असून, 'एवढी काय घाई होती?' असा प्रश्न लोक विचारत आहेत.
भलतीच उपरती झाली आणि नोकरी सोडली!
हे प्रकरण एका अशा तरुणाचे आहे, ज्याला १२ हजार रुपये मासिक वेतन असलेली, दररोज ९ तासांची सोपी वर्क फ्रॉम होम नोकरी मिळाली होती. मात्र, त्याने स्वतःच आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, 'वाटलं होतं, जमेल...', पण जॉईन झाल्यानंतर अवघ्या ३ तासांतच त्याला काही उपरती झाली आणि त्याने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.
व्हायरल रेडिट पोस्टनुसार, या तरुणाचे मत होते की, ही हलकी नोकरी त्याचा इतका वेळ खाईल की, त्याची करिअर ग्रोथच थांबेल. त्यामुळे, या नोकरीत आपला वेळ वाया घालवण्याऐवजी सुरुवातीलाच टाटा बाय-बाय करणे योग्य आहे, असे त्याला वाटले. थोडक्यात सांगायचे तर, या जेन झी कर्मचाऱ्याच्या मते, ही नोकरी त्याच्यासाठी 'स्लो पॉयझन'सारखी होती, जी त्याने अवघ्या ३ तासांत सोडून दिली.
Got my first job , Quit 3 hours later
by
u/Minimum-Tip7839 in
IndianWorkplace
सोशल मीडियावर गंमतीशीर प्रतिक्रिया
या कर्मचाऱ्याच्या अति ज्ञानाच्या गोष्टी सोशल मीडियावरील अनेक वापरकर्त्यांना पचलेल्या नाहीत आणि रेडिटवर गंमतीशीर प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला आहे. काही रेडिटर्सनी मजा घेत कमेंट केल्या की, 'हे तर 'पीक लेव्हल' आहे!' तर काही युजर्सचे म्हणणे होते की, जर कामात मजा येत नसेल किंवा कौशल्ये विकसित होण्याची शक्यता नसेल, तर ते काम जास्त काळ ओढण्यात काही अर्थ नाही.
याशिवाय, काही अनुभवी युजर्सनी सल्ला दिला की, करिअरच्या सुरुवातीला कमी ताण असलेल्या नोकरीत काही महिने टिकून राहून अनुभव घेणे गरजेचे होते. पण, या ३ तासांच्या राजीनाम्यामुळे सोशल मीडियावर एक मोठी चर्चा सुरू झाली आहे.