खतरनाक कारनामा! विमानात उकडायला लागलं म्हणून महिला इमरजन्सी दरवाजा उघडून पंखावर फिरू लागली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 10:56 IST2020-09-03T10:22:45+5:302020-09-03T10:56:10+5:30
एका महिलेने फ्लाइटचा इमरजन्सी दरवाजा उघडला आणि बाहेर जाऊन विंग(पंखावर)वर फिरू लागली. जशी काही बागेत फिरायला आली.

खतरनाक कारनामा! विमानात उकडायला लागलं म्हणून महिला इमरजन्सी दरवाजा उघडून पंखावर फिरू लागली!
विमान प्रवासादरम्यान एका महिलेने असा काही कारनामा केलाय की, तिची चर्चा जगभरात होऊ लागली आहे. ही घटना आहे यूक्रेनची. रिपोर्टनुसार, एक विमान तुर्कीतून यूक्रेन एअरपोर्ट उतरलं. जिथे एका महिलेने फ्लाइटचा इमरजन्सी दरवाजा उघडला आणि बाहेर जाऊन विंग(पंखावर)वर फिरू लागली. जशी काही बागेत फिरायला आली.
'द सन'ने दिलेल्या वृत्तानुसार, यूक्रेन इंटरनॅशनलने अशी घटना घडल्याचे मान्य करत सांगितले की, विमान संख्या PS6212 अंताल्यातून कीवच्या एका महिला प्रवाशाने टर्मिनल डीचं गेट 11 जवळ थांबल्यानंतर विमानाचं इमरजन्सी गेट उघडलं आणि विमानाच्या पंखावर जाऊन फिरू लागली.
महिला तुर्कीतील अंताल्यामध्ये सुट्टी संपवून परतत होती. पण जेव्ह विमान यूक्रेनच्या कीवमध्ये लॅंड झालं तेव्हा तिला विमानात उकडायला लागलं होतं. ज्यानंतर तिने इमरजन्सी गेट उघडलं आणि ती पंखावर फिरू लागली होती. इतकेच नाही तर तिथेही बसलीही होती. महिलेचा हा कारनामा पाहून सगळेच हैराण झाले होते.
या घटनेनंतर यूक्रेन इंटरनॅशनल एअरलाइन्स द्वारे महिलेला ब्लॅकलिस्ट करण्यात आलंय. म्हणजे एका निश्चित काळापर्यंत महिला या एअरलाइन्सने प्रवास करू शकणार नाही.