Video: फोटो काढत असताना वाघाने चिमुरड्यावर घेतली झडप अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 13:54 IST2020-01-30T13:54:04+5:302020-01-30T13:54:15+5:30

फोट काढण्यासाठी उभा असताना वाघ अचानक त्याच्या दिशेने हळहळू चालत आला.

Video: The tiger was slowly approaching while taking a small boy photo | Video: फोटो काढत असताना वाघाने चिमुरड्यावर घेतली झडप अन्...

Video: फोटो काढत असताना वाघाने चिमुरड्यावर घेतली झडप अन्...

एका लहान मुलावर वाघाने झडप घेत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लहान मुलगा फोटो काढण्यासाठी पाठ करुन उभा असताना मागे अचानक वाघ येतो आणि मुलाच्या अंगावर हल्ला करण्यासाठी झडप घेत असल्याचे दिसून येत आहे.

मुलाच्या वडिलांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करुन आयर्लंडमधील डब्लिन प्राणीसंग्रहालयात हा सर्व प्रकार घडला असल्याचे त्यांनी सांगितले. माझा मुलगा फोट काढण्यासाठी उभा असताना वाघ अचानक त्याच्या दिशेने हळहळू चालत आला आणि त्याने मुलाच्या अंगावर झडप मारली. मात्र मुलागा आणि वाघ यांच्यामध्ये मोठी काच असल्याने मुलाचे प्राण वाचतात.  

Web Title: Video: The tiger was slowly approaching while taking a small boy photo