Video: सुपरमार्केट जलमय, पाण्यासोबत आलेल्या माशांवर नागरिकांनी मारला ताव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 17:20 IST2021-09-07T17:15:01+5:302021-09-07T17:20:40+5:30
Shocking Video of supermarket: या व्हिडिओमध्ये एका सुपरमार्केटचा संपूर्ण मजला पाण्याने भरलेला दिसत आहे.

Video: सुपरमार्केट जलमय, पाण्यासोबत आलेल्या माशांवर नागरिकांनी मारला ताव
अनेकदा तुम्ही शॉपिंग मॉल किंवा सुपरमार्केटमध्ये जाऊन राशन किंवा खाद्यपदार्थ खरेदी केले असतील. शाकाहारी, मांसाहारासह असे सर्व खाद्यपदार्थ शॉपिंग मॉलमध्ये उपलब्ध असतात. पण, आता सोशल मीडियाव अशा एका शॉपिंग मॉलचा व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात सुपरमार्केटमध्ये पाण्यासह शेकडो मासे आल्याचे दिसत आहेत.
इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, एका सुपरमार्केटचा संपूर्ण मजला पाण्याने भरलेला दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शेकडो मासे या पाण्यात दिसत आहेत. यावेळी सुपरमार्केमधले काही लोक त्या माशांना वाचवत आहेत, तर काहीजण त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.
For heaven’s hake 😳 pic.twitter.com/EhPdHW875l
— Best Videos 🎥🔞 (@CrazyFunnyVidzz) August 23, 2021
व्हिडिओ व्हायरल
लोक व्हिडिओ पाहून अंदाज लावत आहेत की हे मासे त्याच स्टोअरमध्ये विक्रीसाठी ठेवले गेले असावेत आणि काही कारणास्तव माशाने भरलेले टोपले जमिनीवर पडले असावेत. हा व्हिडिओ @CrazyFunnyVidzz नावाच्या एका अकाऊंटने शेअर केला आहे.