Video : खेळणं समजून किंग कोब्राशी खेळत बसला चिमुकला! पुढे जे घडतंय ते बघून तुम्हालाही होईल धाकधूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 18:46 IST2025-05-30T18:44:05+5:302025-05-30T18:46:06+5:30

सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक छोटं मूल जमिनीवर बसलेल्या कोब्रा सापासोबत निष्पापपणे खेळताना दिसत आहे.

Video: Little boy plays with a king cobra like a toy! You'll be shocked to see what happens next | Video : खेळणं समजून किंग कोब्राशी खेळत बसला चिमुकला! पुढे जे घडतंय ते बघून तुम्हालाही होईल धाकधूक

Video : खेळणं समजून किंग कोब्राशी खेळत बसला चिमुकला! पुढे जे घडतंय ते बघून तुम्हालाही होईल धाकधूक

Baby playing With Cobra : लहान मुलांना कोणत्याही वस्तूंशी खेळायला किती आवडतं, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. अनेकदा ती कोणतीही वस्तू, अगदी धोकादायक असली तरीही ते खेळण्यासारखी वापरतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही धक्का बसू शकतो. सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक छोटं मूल जमिनीवर बसलेल्या कोब्रा सापासोबत निष्पापपणे खेळताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये मूल कोब्रा सापाला खेळण्यासारखं हाताळत आहे. कधी तो सापाचा फणा पकडण्याचा प्रयत्न करतोय, तर कधी त्याची शेपटी ओढतो. विशेष म्हणजे, कोब्रा साप असूनही तो अजिबात आक्रमक न होता शांत राहिला असून, मुलाला काहीही इजा करत नाही. हे पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

पाहा व्हिडीओ 

कोब्रा साप हा अत्यंत विषारी सापांपैकी एक मानला जातो. जर त्याने एखाद्याला चावलं, तर योग्य वेळी उपचार न झाल्यास मृत्यू होण्याचा धोका असतो. त्यामुळे हा प्रसंग केवळ धक्कादायकच नाही, तर अत्यंत जीवघेणाही ठरू शकला असता.

व्हिडीओमुळे सोशल मीडियावर खळबळ

लहान मुलाचा सापासोबत खेळतानाचा हा व्हिडीओ ट्विटरवर rareindianclips या हँडलवरून शेअर करण्यात आला होता. याला “कोब्रा विरुद्ध बाबुआ” असे कॅप्शन देण्यात आले आहे. आतापर्यंत ५४,००० हून अधिक वेळा लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. मात्र, व्हिडीओ पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली, तर काहींनी मुलाच्या धाडसाचं कौतुक केलं.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलं, “शक्यता आहे की हा साप विषारी नसेल.” तर दुसऱ्याने विचारलं, “कदाचित सापाचं विष आधीच काढून घेतलं असेल?” काहीजणांनी मुलाच्या धाडसाचं कौतुक केलं आहे.

Web Title: Video: Little boy plays with a king cobra like a toy! You'll be shocked to see what happens next