शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Kshama Bindu : Video - ती सध्या काय करते?; स्वतःशीच लग्न केलेल्या क्षमा बिंदूने साजरी केली Wedding Anniversary

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 11:11 IST

Kshama Bindu : लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्याचं क्षमाने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगितलं आहे. क्षमाने एक व्हिडीओ शेअर केला आहे

गुजरातमधील रहिवासी असलेल्या क्षमा बिंदूने वर्षभरापूर्वी स्वतःशीच लग्न केलं होतं. तिच्या या निर्णयाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या तर काहींना धक्का बसला. मात्र आता क्षमा बिंदू तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे. सहसा लोक लग्नाचा वाढदिवस एकत्र साजरा करतात. दोघेही एकमेकांना भेटवस्तू देतात. पण इथे स्वतःशीच लग्न करणारी क्षमा एकटीच तिचा वाढदिवस आनंदाने साजरा करत आहे.

लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्याचं क्षमाने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगितलं आहे. क्षमाने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एकला चलो रे टॅटूही दिसत आहे. लग्नाच्या वाढदिवसाचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर लोक क्षमाचं अभिनंदन करत आहेत. हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. क्षमा ही भारतातील पहिली महिला आहे जिने वयाच्या 24 व्या वर्षी स्वतःशी लग्न केले. लग्न समारंभासाठी बिंदूने तिच्या जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांना आमंत्रित केलं होतं.

क्षमाने विधीवत, मोठ्या थाटामाटात लग्न केलं. तिने सांगितले की, तिच्या आईने स्वतःशी लग्न करण्याच्या निर्णयात तिला कसा पाठिंबा दिला. लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. स्वत:शी लग्न केल्यानंतर क्षमाचे आयुष्य अजिबात सोपं राहिलं नाही. गुजरातमधील वडोदरा येथील सुभानपुरा भागात राहणाऱ्या क्षमाला लग्नानंतर तिचं शहर सोडावं लागलं. एवढेच नाही तर क्षमाने नोकरीही सोडली होती. क्षमा ज्या सोसायटीत राहत होती त्या घरमालकाने तिला घर रिकामं करण्यास सांगितलं.

सोसायटीच्या दबावाखाली घरमालकाने हा निर्णय घेतला. क्षमाने याबाबत माहिती दिली होती आणि मी सध्या कोणत्या शहरात राहते हे सांगणार नाही, असं सांगितलं होतं. 11 जून रोजी क्षमाने स्वतःशी लग्न केलं. क्षमाने एकटीनेच लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. हिंदू धर्मात अशी तरतूद नाही, त्यामुळे यानंतर वाद सुरू झाले. मंदिरातही असे विवाह करू नयेत, असा इशारा देण्यात आला. पण क्षमाने नवरदेवाशिवाय मंडपात सप्तपदी घेतले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेmarriageलग्नSocial Mediaसोशल मीडिया