दोनदा परस्पर आयफेल टॉवर विकणारा असा ठग, ज्याची होती ४७ नावं अन् बोलायचा पाच भाषा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 12:31 PM2020-01-24T12:31:12+5:302020-01-24T12:37:24+5:30

भारतातील नटवर लाल नावाच्या ठगाबाबत तुम्ही तर ऐकलं असेलच. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका ठगाबाबत सांगणार आहोत ज्याला तब्बल ४७ नावांनी ओळखले जात होते. त्याला पाच भाषा बोलता येत होत्या.

Victor Lustig a highly skilled con artist who sold the Eiffel tower twice | दोनदा परस्पर आयफेल टॉवर विकणारा असा ठग, ज्याची होती ४७ नावं अन् बोलायचा पाच भाषा...

दोनदा परस्पर आयफेल टॉवर विकणारा असा ठग, ज्याची होती ४७ नावं अन् बोलायचा पाच भाषा...

Next

भारतातील नटवर लाल नावाच्या ठगाबाबत तुम्ही तर ऐकलं असेलच. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका ठगाबाबत सांगणार आहोत ज्याला तब्बल ४७ नावांनी ओळखले जात होते. त्याला पाच भाषा बोलता येत होत्या. त्याला व्हिक्टर लुस्टिग, चार्ल्स ग्रोमर, अलबर्ट फिलिप्स, रॉबर्ट जॉर्ज वेग्नर सारख्या नावांचा समावेश होता. या ठगाचं खरं नाव काय होतं हे आम्ही तुम्हाला सांगितलं नाही, कारण ते आम्हालाही माहीत नाही.

ही व्यक्ती ५ दशकं वेगवेगळ्या देशातील पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला होता. एफबीआयने त्याला व्हिक्टर लुस्टिग असे म्हटले. पण हे त्याच्या ४७ नावांपैकी एक होतं. आता यात जर एफबीआयसारख्या मोठ्या सुरक्षा संस्थेचं नाव येतं त्यामुळे अर्थातच यातील उत्सुकता वाढते. ब्रिटीश पत्रकार जॅफ मेश यांनी या किस्स्यावर 'हॅंडसम डेविल' नावाचं पुस्तक लिहिलं. यात त्यांनी सांगितलं की, 'ही व्यक्ती जेव्हाही एफबीआयपासून पळत होतो, त्याचा पाठलाग करणाऱ्या एजन्टची तो खिल्ली उडवण्यासाठी त्यांच्या नावाने हॉटेलमध्ये रूम बुक करायचा आणि त्यांच्या नावाने जहाजांची सफर करत होता'.

(Image Credit : Social Media)

एफबीआयच्या रेकॉर्डनुसार, तो एक ऑक्टोबर १८९० ला होस्टाइनमध्ये जन्माला आला होता. होस्टाइन आधी अस्ट्रो-हंगेरिअन साम्राज्य होता आणि आता त्याला आता चेक गणराज्य म्हणून ओळखलं जातं. जॅफ सांगतात की, 'त्याने आम्हाला इतक्या गोष्टी सांगितल्या की, आम्हाला आजही हे माहीत नाही की, तो कुठे जन्माला आला होता. मी एका स्थानिक इतिहासकारासोबत बोललो. पण अशा नावांची कुणीही व्यक्ती असल्याचा काहीच रेकॉर्ड नसल्याचं त्यांनी सांगितलं'.

(Image Credit : Social Media)

अमेरिकेत १९२० चं दशक हे गॅंगस्टर अल कपोनी आणि जॅज यांच्यासाठी ओळखलं जातं. हा तो काळ होता जेव्हा पहिलं महायुद्ध संपलं होतं. अमेरिका वर येत होता. त्यावेळी अमेरिकेतील ४० शहरातील गुप्तहेरांनी या ठगाला सिट्राज हे टोपण नाव दिलं होतं. सिट्राज एक स्पॅनिश शब्द आहे ज्याचा अर्थ जखम असा होतो. हे नाव त्याला त्याच्या डाव्या गालावरील असलेल्या खुणेमुळे मिळालं होतं. ही खुण त्याला पॅरीसमध्ये त्याच्या एका गर्लफ्रेन्डने दिली होती.

(Image Credit : Social Media)

१९२५ मध्ये अमेरिकेतील सीक्रेट एजन्ट जेम्स जॉनसन यांच्यानुसार, व्हिक्टर लुस्टिग मे मध्ये पॅरिसला पोहोचला. येथील एका लक्झरी हॉटेलमध्ये त्याने मेटल वेस्ट इंडस्ट्रीतील मोठ्या उद्योगपतींची भेट घेतली. या मीटिंगमध्ये त्याने स्वत:ला फ्रान्स सरकारचा एक अधिकारी सांगितलं होतं. 

लुस्टिंग या मीटिंगमध्ये म्हणाला होता की, 'इंजिनिअरींगशी संबंधित अपयशामुळे, जास्त खर्चामुळे आणि काही राजकीय समस्यांमुळे आयफेल टॉवर पाडणं गरजेचं आहे. टॉवरची सर्वात जास्त बोली लावणाऱ्याला दिला जाईल'. असं नंतर पुन्हा दोनदा केलं. 

(Image Credit : Social Media)

व्हिक्टर लुस्टिगने त्याच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी केल्या ज्यामुळे अनेक सरकारांची रात्रीची झोप उडाली होती. तुरूंग तोडून फरार होणं हे तर त्यांच्यासाठी फारच सोपं काम होतं. अखेर अमेरिकी सरकारने त्याला एका अल्काट्राज तुरूंगात टाकलं. इथेच १९४७ च्या ११ मार्चला निमोनियामुळे त्याचा मृत्यू झाला. तो फारच पैसे उडवणारा आणि शाही जीवन जगणारा ठग होता. 

Web Title: Victor Lustig a highly skilled con artist who sold the Eiffel tower twice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.