बाबो! कपड्यांवरच उगवल्या भाज्या, मग काय बाजारात जायची गरजच नाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 16:00 IST2019-12-31T15:59:34+5:302019-12-31T16:00:48+5:30
तुम्ही आतापर्यंत जमिनीवर किंवा शेतात झाड उगवल्याचं ऐकलं असेल पण तुम्ही कधी कपड्यांवर झाडं उगवल्याचे ऐकलं आहे का?

बाबो! कपड्यांवरच उगवल्या भाज्या, मग काय बाजारात जायची गरजच नाही...
तुम्ही आतापर्यंत जमिनीवर किंवा शेतात झाड उगवल्याचं ऐकलं असेल पण तुम्ही कधी कपड्यांवर झाडं उगवल्याचे ऐकलं आहे का? नसेल ऐकलं तर जाणून घ्या या ठिकाणी चक्क स्टाईल म्हणून स्वतःच्या कपड्यंवरच शेत उगवलं आहे. एक नवीन प्रयोग करण्यात आला आहे.
अरुसिआक गेब्रियल एक डिजाइनर आहेत त्यांनी फॅशनशी निगडीत काही गोष्टी सांगतल्या आहेत. त्या असं म्हणतात की स्वतःच जेवण स्वतः उगवा. हाच विचार मनात ठेवून या डिजायनरने एक ड्रेस तयार केला आहे. या ड्रेसवर बागबगीचा आहे. त्यात काही भाज्या उगवल्या आहेत म्हणजेच तुम्ही ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी या ड्रेसवरच्या बागबगीच्या सोबत घेऊन जाणार. ग्रेबियल चा हा प्रोजेक्ट बॉटनिस्ट पॅट्रिक ब्लॅंक यापासून प्रभावित झाला आहे. या कपडयावरच्या झाडाला बनियन चा आकार देण्यात आला आहे.
त्यात मायक्रोग्रेन भाज्या उगवल्या जाऊ शकतात. यांत अंकूर फुटलेल्या बीजाला वाढण्यासाठी २ आठवडे लागतात. या झाडांना पोषण मिळण्यासाठी चक्क झाड़ाच्या कपड्यांचा ड्रेस घालत असलेल्या व्यक्तीच्या मुत्राचा वापर केला जातो. यासाठी मानवी मुत्र त्या झाडापर्यंत पोहोचण्यासाठी ऑस्मोसिस या प्रकितेतून जावे लागते. यात आत्ता पर्यंत बारा वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आले आहेत. त्यात कोबी, गाजर, स्ट्रोबेरी, शेेंगदाणे यांचा समावेश आहे. या भाज्या एकत्रितपणे सुद्धा लावल्या जातात. या प्रोजेक्टवर आर्किटेक्चर काम करत आहेत, तसेच अशा प्रकारच्या झाडांना सिंचन व्यवस्था कशी उपलब्ध होणार यासाठी प्रयत्न केले जात आहेत.