लग्नाच्या 8 वर्षानंतरही शारीरिक संबंध ठेवू शकलं नाही हे स्टार कपल, आता पत्नीने मागितले 15 कोटी रूपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 15:40 IST2022-06-04T15:39:44+5:302022-06-04T15:40:18+5:30
वर्षा प्रियदर्शनी आणि अनुभव मोहंती आजकाल त्यांच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहेत. त्यांची घटस्फोटाची केस सध्या सगळीकडे चर्चेचं कारण ठरत आहे.

लग्नाच्या 8 वर्षानंतरही शारीरिक संबंध ठेवू शकलं नाही हे स्टार कपल, आता पत्नीने मागितले 15 कोटी रूपये
Viral News: ओडिया फिल्म इंडस्ट्रीतील फमेस कपल काही दिवसांपासून चर्चेत आहे. हे कपल ओडिया सिनेमांमध्ये हिट तर होतंच सोबतच हे कपल राजकारणाशीही निगडीत आहे. आम्ही सांगतोय ओडिया अभिनेत्री वर्षा प्रियदर्शनी आणि अभिनेता-खासदार अनुभव मोहंतीबाबत. हे कपल चर्चेत असण्याचं कारण त्यांचा सिनेमा किंवा राजकारण नाहीये. यावेळी त्यांचं चर्चेत असण्याचं कारण वेगळंच आहे.
वर्षा प्रियदर्शनी आणि अनुभव मोहंती आजकाल त्यांच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहेत. त्यांची घटस्फोटाची केस सध्या सगळीकडे चर्चेचं कारण ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच दोघांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले होते. अनुभव म्हणाला होता की, लग्नाच्या 8 वर्षानंतरही पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवू शकले नाही. संबंध ठेवण्याचा प्रयत्न करूनही निराशाच हाती आली. याच आधारावर त्याने पत्नीपासून घटस्फोट मागितला आहे.
दुसरीकडे वर्षाने पती अनुभववर कौंटंबिक हिंसा आणि अत्याचाराचा आरोप लावला आहे. इतकंच नाही तर तिने 15 कोटी रूपयांची पोटगीही मागितली आहे. अनुभव मोहंत बीजू जनता दलचे खासदार आहेत. अनुभव आणि वर्षाने 2014 मध्ये लग्न केलं होतं लग्नाच्या काही वर्षातच दोघांमध्ये वाद सुरू झाला होता.
हे प्रकरण आता इतकं वाढलं आहे की, दोघांनी सार्वजनिकपणे एकमेकांवर गंभीर आरोप करणं सुरू केलं आहे. यानंतर 2020 मध्ये अनुभवने दिल्लीच्या एका फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला. नंतर ही केस दिल्लीहून ओडिशाच्या कटकमध्ये ट्रान्सफर करण्यात आली.