या व्हॅलंटाईन वीक मध्ये अवकाशात होणार एक अद्भूत मिलन, जाणू घ्या कोणत्या दिवशी अन् काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 02:58 PM2022-02-07T14:58:20+5:302022-02-07T15:07:35+5:30

१३ फेब्रुवारी रोजी म्हणजेच व्हॅलंटाईन डेच्या आदल्या दिवशी अवकाशात एक अद्भूत अन् रोमांचकारी घटना घडणार आहे. विशेष म्हणजे हा क्षण तुम्ही कोणत्याही दुर्बीणीशिवाय नजरेत कैद करु शकता. प्रेमी जोडप्यांसाठी तर ही एकप्रकारची पर्वणी ठरणार आहे.

valentines day Venus and mars conjunction will spice up your valentines day before evening that is 13 February | या व्हॅलंटाईन वीक मध्ये अवकाशात होणार एक अद्भूत मिलन, जाणू घ्या कोणत्या दिवशी अन् काय?

या व्हॅलंटाईन वीक मध्ये अवकाशात होणार एक अद्भूत मिलन, जाणू घ्या कोणत्या दिवशी अन् काय?

googlenewsNext

व्हॅलंटाईन वीक सुरु झालाय. प्रेमी जोडप्यांचे प्लान्स आता ठरायला सुरुवात झालीय. याच वेळी आकाशातही एक मिलन घडणार आहे. १३ फेब्रुवारी रोजी म्हणजेच व्हॅलंटाईन डेच्या आदल्या दिवशी अवकाशात एक अद्भूत अन् रोमांचकारी घटना घडणार आहे. विशेष म्हणजे हा क्षण तुम्ही कोणत्याही दुर्बीणीशिवाय नजरेत कैद करु शकता. प्रेमी जोडप्यांसाठी तर ही एकप्रकारची पर्वणी ठरणार आहे.

१३ फेब्रुवारीला अवकाशात मंगळ आणि शुक्र (Mars and Venus) या ग्रहांचं मिलन पाहायला मिळणार आहे. तुमच्या डोळ्यांनी तुम्ही हा आगळा-वेगळा सोहळा पाहू शकणार आहात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढ्या मोठ्या अवकाशात शुक्र आणि मंगळ ग्रह कसा ओळखायचा. तर काळजी करण्याची गरज नाही. या दोन ग्रहांना आकाशातील अनेक ताऱ्यांमधून कसं ओळखायचं, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

खगोलशास्त्राच्या भाषेत ग्रहांच्या मिलनाला कंजक्शन असं म्हटलं जातं. आता सर्वांत महत्त्वाचा प्रश्न हे कधी पाहायला मिळेल. तर हे दृश्य रात्री 9.38 वाजता दिसणार आहे. InTheSky.org नावाची साईट अशा अद्भूत दृश्यांचा व्हिडीओ स्वरूपात संग्रह करते. ही साईट Nasa’s Jet Propulsion Laboratory मधील पब्लिक डाटाच्या मदतीने ग्रहांच्या स्थितीचा मागोवा घेत असते. यातूनच 13 फेब्रुवारीला मंगळ (Mars) आणि शुक्र (Venus) या ग्रहांचं मिलन होणार असल्याची माहिती समोर आली.

मंगळ आणि शुक्र या दोन्ही ग्रहांचं जेव्हा मिलन होईल, तेव्हा मंगळ ग्रह खूप तेजस्वी दिसेल. दोन्ही ग्रह दक्षिण दिशेला एकत्र आलेले दिसतील. दोन्ही ग्रहांचं तेजस्वी मिलन पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज भासणार नाही. पण, यानंतरही तुम्हाला हे दोन्ही ग्रह ओळखता येत नसतील तर या दोन्ही ग्रहांना ओळखण्यासाठी तुम्ही अँड्रॉइड आणि आयफोनमधील अ‍ॅप्सची मदत घेऊ शकता.

अँड्रॉइड आणि आयफोनमध्ये ग्रह दाखवणारी अनेक अ‍ॅप्स आहेत. यात SkyView Lite, Star Tracker आणि Star Walk 2 यांचा समावेश आहे. ही अ‍ॅप्स तुम्ही आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून आकाशातील कोणता तारा शुक्र आहे आणि कोणता मंगळ आहे, हे शोधू शकता.

खगोलप्रेमींसाठी हा पर्वणी आहे. मंगळ आणि शुक्र ग्रहांचं मिलन पाहण्याची संधी त्यांना मिळणार आहे. आकाशात ढग नसल्यास साध्या डोळ्यांनी ही घटना पाहता येणार आहे. शुक्र आणि मंगळ हे दोन्ही ग्रह एकमेकांना भेटतील. आकाशात तुम्ही कधीच पाहिलं नसेल असं हे दृश्य असणार आहे. त्यामुळे ग्रहांचं अद्भुत मिलन पाहण्याची ही संधी कदापि सोडू नका.

Web Title: valentines day Venus and mars conjunction will spice up your valentines day before evening that is 13 February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.