रेस्टॉरंटमध्ये जेवणात कपलला सापडली मौल्यवान वस्तू, बनवली साखरपुड्याची अंगठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 16:17 IST2023-07-28T16:17:32+5:302023-07-28T16:17:53+5:30
सॅंडी सिकोरस्की आणि केन स्टीनकॅम्प चार वर्षांपासून डाउनटाऊन वेस्टरली, रोड आयलॅंडमध्ये द ब्रिज रेस्टॉरंट आणि रॉ बारमध्ये जात होते.

रेस्टॉरंटमध्ये जेवणात कपलला सापडली मौल्यवान वस्तू, बनवली साखरपुड्याची अंगठी
साखरपुडा आणि लग्न अशा गोष्टी आहेत ज्यासाठी कपल एक गोष्ट फार बारकाईने निवडतात. पण एका कपलला नुकतीच एक अशी वस्तू सापडली जी त्यांनी त्यांच्या खास दिवसासाठी ठेवली. त्यांच्या साखरपुड्याच्या अंगठीसाठी त्यांना एक महागडा मोती एका रेस्टॉरन्टमध्ये जेवण करताना भाजीत सापडला.
सॅंडी सिकोरस्की आणि केन स्टीनकॅम्प चार वर्षांपासून डाउनटाऊन वेस्टरली, रोड आयलॅंडमध्ये द ब्रिज रेस्टॉरंट आणि रॉ बारमध्ये जात होते. फॉक्स 8 च्या रिपोर्टनुसार, रेस्टॉरंन्टच्या बाजूलाच एक नदी होती. त्यामुळे इथे वेगवेगळे सी फूड खायला मिळत होते. अशात एक दिवस सॅंडी आणि केन यांनी क्लॅमची एक प्लेट ऑर्डर केली. जेव्हा कपल जेवण करत होतं तेव्हा त्यांना समुद्रात सापडणारा दुर्मिळ मर्सिनेरिया 9.5 मिनीचा अंडाकार मोती सापडला. नंतर हा मोती त्यांनी त्यांच्या साखरपुड्याच्या अंगठीत लावला.
केन याने या घटनेचा किस्सा इन्स्टावर शेअर केला. कपलकडून रेस्टॉरंटने लिहिलं की, 'आम्ही डिसेंबरमध्ये ब्रिजमध्ये गेलो होतो आणि काही ताज्या क्वाहॉग्सचा आनंद घेतला. जेवणाच्या प्लेटमध्ये मला अंडाकार मोती सापडला. जो फार दुर्मिळ आहे. या मोत्यापासून आम्ही आमची साखरपुड्याची अंगठी बनवली.
या पोस्टला काही दिवसातच शेकडो लाइक्स मिळाले आहेत. तर लोकांनी यावर वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत. लोकांनी दोघांसाठी आनंद व्यक्त केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.