तरूणाने एकाचवेळी 5 गर्लफ्रेंड्सना केलं प्रेग्नेंट, सगळ्यांचं सोबत केलं बेबी शॉवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 13:54 IST2024-01-22T13:54:22+5:302024-01-22T13:54:33+5:30
29 वर्षीय एश्लीगने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बेबी शॉवर इन्विटेशनही शेअर ज्यात लिहिलं आहे की, 14 जानेवारीला क्वींसमध्ये पार्टीचं आयोजन केलं जाईल.

तरूणाने एकाचवेळी 5 गर्लफ्रेंड्सना केलं प्रेग्नेंट, सगळ्यांचं सोबत केलं बेबी शॉवर
न्यूयॉर्क शहरात राहणारा 22 वर्षीय संगीतकार जेड्डी विलने एकाचवेळी आपल्या 5 गर्लफ्रेंडला गर्भवती केलं. इतकंच नाही तर आणखी एक बाब म्हणजे पाचही महिलांचं बेबी शॉवर त्याने सोबतच केलं. न्यूयॉर्क पोस्टनुसार, जेड्डीची एक पार्टनर लिजी एश्लीगने टिकटॉकवर हा दावा केला आहे.
29 वर्षीय एश्लीगने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बेबी शॉवर इन्विटेशनही शेअर ज्यात लिहिलं आहे की, 14 जानेवारीला क्वींसमध्ये पार्टीचं आयोजन केलं जाईल.
जेड्डी विलने निमंत्रण पत्रिकेसाठी या गर्भवती महिलासोबत एक फोटोही काढला. ज्यात लिहिलं आहे की, छोटा जेडी विल्स 1-5 चं स्वागत आहे.
तेच एश्लीगने अमेरिकन टीव्ही चॅनल टीएलसीच्या वहुविवाह असलेल्या परिवाराच्या जीवनावर आधारित एका शो चा उल्लेख करत व्हिडिओत लिहिलं की, आता मला वाटतं की, आम्ही सिस्टर वाइफ्स आहेत.
एश्लीगने आणखी एक व्हिडीओ शेअर करत 5 महिलांचा उल्लेख करत लिहिलं की, 'एशले, बोनी बी, के मेरी, जायलीन विया आणि इयानला कलीफा गॅलेटीने एकमेकांना स्वीकार केलं आहे.
तिन एक आणखी एक फोटो शेअर करत लिहिलं की, 'आमचा सुंदर परिवार बघा. आम्ही आमच्या बेबीच्या वडिलावर प्रेम करतो. आम्ही आमच्या मुलांचं जीवन उद्ध्वस्त करणार नाही. आमच्या परिवारांनी हे मान्य केलं'.
बेबी शॉवर व्हिडिओत 5 महिला सोबत नाचताना, जेवण करताना आणि एकमेकांची कंपनी एन्जॉय करताना दिसत आहेत. पण त्यांच्या या वागवण्यावर सोशल मीडियावरील बरेच लोक नाराज आहेत. कारण त्यांना हे पटत नाहीये.