समुद्र मंथन आणि त्यातन निघालेल्या कलशाच्या गोष्टी तर अनेक वर्षांपासून आपण ऐकत आलो आहोत. काही लोक याला केवळ एक पौराणिक कथा मानतात. मात्र, तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, मुस्लिम देश इंडोनेशियामध्ये एक असं मंदिर आहे, ज्याबाबत असं मानलं जातं की, इथे आजही समुद्र मंथनातून निघालेला अमृत कलश आहे.
या मंदिराचं नाव कंडी सुकुह असं असून हे मंदिर मध्य आणि पूर्व प्रांत जावाच्या सीमेवर माउंट लावू येथे आहे. या प्राचीन मंदिरात एक असा कलश आहे, ज्यात एक द्रव्य हजारो वर्षांपासून तसंच आहे. असे मानले जाते की, हे अमृत आहे, जे कधीही नष्ट झालं नाही.
२०१६ मध्ये इंडोनेशियाच्या पुरातत्व विभागाने या मंदिराच डागडुजी केली होती. तेव्हाच या मंदिराच्या भींतीत संशोधकांना एक तांब्याच कलश सापडला. यावर एक पारदर्शी शिवलिंग आहे आणि कलशाच्या आत द्रव्य आहे.
शोधातून असं समोर आलं की, तांब्याचा कलश कुणीही उघडू शकणार नाही, अशाप्रकारे जोडण्यात आला होता. आणखी एक सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे ज्या भींतीमध्ये हा कलश मिळाला त्यावर समुद्र मंथनाची चित्रे काढलेली आहेत. तसेच महाभारतातील काही उल्लेखही आहेत.
असे मानले जाते की, तांब्याचा हा कलश इसपूर्व १ हजार मधील आहे. तर मंदिर ईसपूर्व १४३७ मध्ये तयार करण्यात आलं होतं. या काळात मलेशिया पूर्णपणे हिंदू राष्ट्र होता. पण १५व्या शतकात जेव्हा इंडोनेशियामध्ये मुस्लिम वर्चस्व वाढलं तेव्हा या मंदिराची तोडफोड करण्यात आली. असं मानलं जातं की, तेव्हापासूनच कलश या मंदिरात लपवून ठेवला आहे.