Weird Rituals : लग्नाचा क्षण हा प्रत्येक तरूण - तरूणीच्या जीवनातील खूप महत्वाचा क्षण असतो. लग्नानंतर त्यांचं आयुष्य बदलणार असतं. नवीन जबाबदाऱ्या येणार असतात. नवीन अनुभव मिळणार असतात. अर्थातच नव्या जोडप्याला वेगवेगळ्या गोष्टींसोबतच सर्वात जास्त उत्सुकता असते ती, पहिल्या रात्रीची. जगभरात लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीच्या वेगवेगळ्या प्रथा - रिवाज असतात. धर्मानुसार या प्रथा बदलत असतात. अशाच लग्नाच्या एका वेगळ्या प्रथेबाबत आम्ही आपल्याला सांगणार आहोत. बंगाली लोकांमध्ये लग्नाच्या पहिल्या रात्रीची प्रथा फारच वेगळी आहे.
पहिल्या रात्रीला इथे काळरात्र म्हटली जाते. म्हणजे ही रात्र अशुभ मानली जाते. बंगाली प्रथेनुसार लग्नानंतरच्या पहिल्या रात्री जोडप्याला एकत्र राहता येत नाही. याचं काय कारण असेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर याबाबत एक दंतकथा सांगितली जाते. त्या कथेनुसार ही रात्र 'काळरात्र' मानली जाते.
काय आहे मान्यता?
अशी मान्यता आहे की, भगवान शंकराची मुलगी मनसा ही सर्प देवता होती. पण तिची देवांसारखी पूजा केली जात नव्हती. त्यासाठी ती अनेक प्रयत्न करायची. पण तिला फारसं यश आलं नाही. तिने चांग सौदागर नावाच्या श्रीमंत व्यापाऱ्याला सांगितलं की, माझी देवता म्हणून पूजा कर. पण त्याने नकार दिला. मनसाने त्याला श्राप दिला. याने त्याच्या जहाजे समुद्रात बुडाली आणि सहा मुलांचा मृत्यू देखील झाला. पण तरीही त्याने काही मनसाची पूजा करणं मान्य केलं नाही. त्यानंतर चांद सौदागरच्या लहान मुलाचं लग्न होतं. मनसाने श्राप दिला होता की, जेव्हा नवविवाहित जोडपं सोबत पहिली रात्र घालवेल तेव्हा नवरदेवाचा सर्प दंशाने मृत्यू होईल. झालंही तसंच. चांद सौदागरच्या लहान मुलाचा पहिल्या रात्रीच मृत्यू झाला. मात्र, चांद सौदागरचा लहान मुलगा लखिंदरची पत्नी बेहुलाला तिचा पती परत हवा होता. अनेक प्रयत्नांनंतर बेहुला मनसाला भेटू शकली. बेहुलाची स्थिती पाहून मनसाची सावत्र आई पार्वतीने मनसाला आदेश दिला की, बेहुलाच्या पतीला जीवनदान दे.
मनसाने हा आदेश स्वीकारला. पण एक अट बेहुला समोर ठेवली. ती अट होती की, चांद सौदागरने मनसाचा स्वीकार देवी म्हणून करावा आणि तिची पूजा करावी. गमावलेली सगळी संपत्ती, मुलं परत मिळणार हे पाहून चांद सौदागरने मनसाचा देवी म्हणून स्वीकार केला. नंतर सगळे आनंदाने राहू लागले. तेव्हापासूनच लग्नाची पहिली रात्र काळरात्र म्हणून पाळली जाते. त्यामुळे आजही नवविवाहित जोडपं पहिल्या रात्री वेगळं राहतं.
काय असतात रिवाज?
लग्नाच्या पहिल्या रात्री नवरी-नवरदेव कुटुंबियांसोबत रात्रभर जागतात. यादरम्यान डान्स, मस्ती, गाणी गायली जातात. कारण या रात्री झोपणं देखील अशुभ मानलं जातं. मधुचंद्राची रात्र ही लग्नाच्या दुसऱ्या दिवशी असते. यावेळी नवरीची खोली फुलांनी सजवली जाते आणि जोडपं आपल्या वैवाहिक जीवनाला सुरूवात करतात. दुसऱ्या दिवशी नवरी परिवारासाठी जेवण बनवते आणि घरातील मोठ्याना जेवण वाढते. याला प्रथेला बौ भात म्हटलं जातं.
Web Summary : In Bengali tradition, newlyweds don't spend their first night together due to the 'Kaal Ratri' belief linked to the Manasa Devi legend. The night is spent awake with family, and the honeymoon night occurs the following day.
Web Summary : बंगाल की परंपरा में, मनसा देवी की कथा से जुड़ी 'काल रात्रि' मान्यता के कारण नवविवाहित जोड़े अपनी पहली रात एक साथ नहीं बिताते हैं। यह रात परिवार के साथ जागकर बिताई जाती है, और सुहागरात अगले दिन होती है।