शहरं
Join us  
Trending Stories
1
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
2
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
3
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
5
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
6
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
7
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
8
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
9
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
10
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
11
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
12
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
13
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
14
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
15
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
16
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
17
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
18
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
20
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक

‘बेबी बम्प कॉम्पिटिशन’नं दिला अनोखा संदेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 09:59 IST

गरोदरपणा हा स्त्रीच्या आयुष्यातील एक मोठा टप्पा असतो. तिच्या आयुष्यातलं बहुतेकवेळा ते सगळ्यात मोठं स्थित्यंतर असतं. बहुतेक सगळ्या संस्कृतींमध्ये ...

गरोदरपणा हा स्त्रीच्या आयुष्यातील एक मोठा टप्पा असतो. तिच्या आयुष्यातलं बहुतेकवेळा ते सगळ्यात मोठं स्थित्यंतर असतं. बहुतेक सगळ्या संस्कृतींमध्ये गरोदर स्त्रीचं कोडकौतुक करण्याची पद्धत असते. तिला काय खावंसं वाटतं, ते तिला खाऊ घालून तिचं कौतुक केलं जातं. मात्र त्याचबरोबर अनेक ठिकाणी गरोदर स्त्रीचे दिवस जसे भरत येतात, तशी तिच्यावर अनेक बंधनं घातली जातात. उदाहरणार्थ, आपल्याकडे गर्भवती स्त्रीने ग्रहण बघू नये, असा समज आहे. इतकंच नाही, तर काही ठिकाणी गर्भवती स्त्रीने कमी खावं, असं सांगितलं जातं. त्यांची कल्पना अशी असते की, त्या स्त्रीने कमी आहार घेतला, तर गर्भाची वाढ खूप होणार नाही व प्रसूती सोपी होईल. याबरोबरच परस्परविरोधी प्रथा आणि परंपरादेखील आढळून येतात.

म्हणजे एकीकडे स्त्रीचं डोहाळेजेवण करायचं, त्यासाठी तिला हौसेने वेगवेगळे कपडे घ्यायचे, विविध प्रकारचा साजशृंगार करायचा आणि दुसरीकडे मात्र तिचं पोट कोणाला दिसू नये, याची काळजी घ्यायची. पण या वेगवेगळ्या प्रथापरंपरांमध्ये सहज होणाऱ्या मातृत्वाच्या भावनेवर अनेक बंधनं येतात. मात्र अमेरिका खंडातल्या निकाराग्वा नावाच्या देशात स्त्रीच्या मातृत्वाचा प्रवास साजरा करण्यासाठी एक वेगळीच स्पर्धा भरवण्यात आली. एका स्थानिक रेडिओ वाहिनीने ही ‘बेबी बम्प कॉम्पिटिशन’ भरवली होती. ही स्पर्धा निकाराग्वा देशाच्या मातृदिनाला, अर्थात मदर्स डेला म्हणजे ३० मे रोजी घेतली गेली. 

नऊ महिन्यांची गरोदर असणाऱ्या लैला रिबेका हर्नांडेझने ही स्पर्धा जिंकली. तिच्या बेबी बम्पची एकूण उंची २२ इंच किंवा ५७ सेंटिमीटर्स इतकी भरली. ती म्हणते, बेबी बम्प म्हणजे मातृत्वाचा प्रवास. त्यासाठी लाजायचं कशाला? स्त्रीत्वाचं ते एक अनोखं वैशिष्ट्य आहे. त्याचा सन्मानच व्हायला हवा. इतर महिलांनीही याबाबत सजग व्हावं म्हणून मी या स्पर्धेत भाग घेतला आणि मी त्यात जिंकले!’ बेबी बम्पचा आकार अनेक घटकांवर अवलंबून असतो. त्यात अनुवंशिकता, स्त्रीच्या शरीराची ठेवण, बाळाचं वजन हे घटक तर असतातच, त्याशिवाय जुळं किंवा तिळं असेल तर, अर्थातच बेबी बम्प मोठा असतो. इतकंच नाही, तर गर्भपिशवीतील पाण्याचं प्रमाण किती आहे, यावरही बेबी बम्पचा आकार अवलंबून असतो.

नियमितपणे व्यायाम (विशेषतः पोटाचे व्यायाम) करणाऱ्या स्त्रियांचा बेबी बम्प फारसा दिसत नाही. कारण त्यांचे पोटाचे स्नायू भक्कम असतात आणि ते लवकर ढिले होत नाहीत. त्यामुळेच या बेबी बम्प कॉम्पिटिशनची विजेती कोण, हा प्रश्न फारसा महत्त्वाचा नाही. महत्त्वाचं हे आहे की, एरवी मातृत्व हा तसा दुर्लक्षित असणारा विषय या स्पर्धेच्या निमित्ताने चर्चेत आला. या अनोख्या स्पर्धेचं देश-विदेशात कौतुक होत आहे. अशाप्रकारच्या स्पर्धा जगभरात सगळ्या ठिकाणी व्हायला हव्यात, त्यामुळे मातृत्व आणि त्यासंदर्भातील प्रश्न, महिलांच्या समस्या, गरोदरपणात त्यांना येणाऱ्या अडचणी, या सगळ्या प्रश्नांची चर्चा होईल आणि त्यावरील उपाययोजना केल्या जातील, अशी अपेक्षा तज्ज्ञ आणि अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

गर्भवती स्त्रियांना पुरेसं पोषण मिळणं, त्यांना वेळोवेळी आवश्यक ती वैद्यकीय मदत मिळणं, हे त्या स्त्रीच्या आणि तिच्या पोटात वाढणाऱ्या गर्भाच्या दृष्टीने फार आवश्यक असतं. गरोदरपणाच्या बाबतीतल्या लहान-लहान अडचणींचीदेखील या स्पर्धेच्या निमित्ताने चर्चा होऊ शकते. एरवी गरोदर स्त्रिया या समाजाच्या दृष्टीने कितीही मोलाच्या असल्या, तरीही एकूण लोकसंख्येत त्यांचं प्रमाण नगण्य असल्यामुळे त्यांना येणाऱ्या अडचणींची सहसा दखल घेतली जात नाही. अलीकडे मात्र याविषयी जागृती वाढू लागली आहे. अनेक सेलिब्रिटीही हौसेनं आणि अभिमानानं आपल्या बेबी बम्पचं प्रदर्शन करताना, त्याचे फोटो, व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करतात.

यात लाजण्यासारखं काय आहे?निकाराग्वामध्ये भरवण्यात आलेल्या या बेबी बम्प स्पर्धेच्या निमित्ताने गरोदर स्त्रियांनी त्यांचा बेबी बम्प सार्वजनिक ठिकाणी मिरवला. त्यात लाजण्यासारखं, लपवून ठेवण्यासारखं काही नाही, हा संदेश या स्पर्धेतून निश्चितपणे दिला गेला. निकाराग्वा देशातील स्त्रियांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात असमानतेला तोंड द्यावं लागतं. तिथे महिलांना एकल पालक म्हणून जबाबदारी घ्यावी लागण्याचं प्रमाणही बरंच आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेमुळे मातृत्वाच्या प्रवासाबद्दल जी जाणीव-जागृती होईल ती स्वागतार्ह आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके