शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

जाळ्यात अडकले अनोखे मासे, एका रात्रीत ओडिशाचे मच्छिमार झाले कोट्यधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 13:10 IST

एका व्यापाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या प्रजातीच्या माशाची किंमत सूमारे 13,000 रुपये प्रतिकिलो आहे.

भुवनेश्वर: ओडिशातील दिघामध्ये काही मच्छिमारांचे नशीब एका रात्रीत पालटले आहे. या मच्छिमारांच्या जाळ्यात 121 'तेलिया भोला' नावाचे मासे अडकले. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, या माशांची किंमत अंदाजे 2 कोटी रुपये आहे. या प्रत्येक माशाचे वजन 18 किलो किंवा त्याहून अधिक असल्याचा अंदाज आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या मच्छिमारांनी याआधी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात 'तेलिया भोला' मासा पकडला नव्हता.

मच्छिमारांचे नशिबी रातोरात पालटले

गेल्या वर्षीही मच्छिमारांना दिघा किनार्‍यावरुन तेलिया भोला मासा सापडला होता, मात्र त्यांची संख्या तेव्हा 30 होती. त्यावेळी त्यांना त्या माशाचे एक कोटी रुपये मिळाले होते. मात्र यावेळी माशांच्या संख्येने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. वर्षाच्या पहिल्याच महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात हे मासे उपलब्ध झाल्याने मच्छिमार सुखावले आहेत. या माशांनी अनेक मच्छिमारांना श्रीमंत केले आहे.

13 हजार रुपये प्रतिकिलो किंमतएका मोठ्या व्यापाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या प्रजातीचा मासा खोल समुद्रात आढळतो. पण, या माशांची किंत जास्त असल्यामुळे लोभापोटी मच्छीमार परवानगी नसलेल्या भागातही मासे पकडण्यासाठी जातात. या सर्व गोष्टीमुळेच या माशांची किंमत एवढी जास्त असते. या विशिष्ट प्रकारच्या माशाची किंमत साधारणत: 13000 रुपये प्रतिकिलो असल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे.

या ठिकाणी आढळला अनोखा मासा गेल्या वर्षी ओडिशातील राजनगरमधील तलचुआ भागातून मच्छिमारांनी एक अनोखा मासा पकडला होता. हा मासा 10 हजार रुपये किलो दराने व्यावसायिकाला विकला जात होता. त्या माशाची एकूण किंमत सुमारे दोन लाख रुपये होती. त्या माशाला मयुरी मासादेखील म्हणतात. या दुर्मिळ प्रजातीच्या माशांना पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विकण्यापूर्वी ते सार्वजनिक पाहण्यासाठी ठेवण्यात आले होते.

'तेलिया भोला' मासा इतका महाग का?

एकतर हे मासे खोल समुद्रात आढळतात आणि तिथून त्यांना पकडणे अवघड काम आहे. तसेच, हे तेलिया भोला मासे इतके महाग असण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे, त्यांच्या पोटात अनेक फायदेशीर घटक आहेत. या माशाचे सर्वात मोठे खरेदीदार औषध कंपन्या आहेत. या माशांचा उपयोग अनेक प्रकारची औषधे बनवण्यासाठी केला जातो.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेfishermanमच्छीमारOdishaओदिशा