नोकरीसाठी अर्ज करून मिळाला ३०० वेळा नकार, मग लढवली नामी शक्कल! वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 18:59 IST2021-09-03T18:44:25+5:302021-09-03T18:59:15+5:30

बेरोजगार असल्यावर नोकरी शोधण्यासाठी फार खस्ता खाव्या लागतात. तरीही काहीवेळा नोकरी मिळत नाही. आयरलँडमधील तरुणावरही हिच वेळ आली होती. मात्र या तरुणाने असं काही केलं ज्याची तुम्ही कल्पनाही करु शकत नाही.

unemployed youth rejected 300 times spends 40 thousand for billboard gets no job | नोकरीसाठी अर्ज करून मिळाला ३०० वेळा नकार, मग लढवली नामी शक्कल! वाचून बसेल धक्का

नोकरीसाठी अर्ज करून मिळाला ३०० वेळा नकार, मग लढवली नामी शक्कल! वाचून बसेल धक्का

बेरोजगार असल्यावर नोकरी शोधण्यासाठी फार खस्ता खाव्या लागतात. तरीही काहीवेळा नोकरी मिळत नाही. आयरलँडमधील तरुणावरही हिच वेळ आली होती. मात्र या तरुणाने असं काही केलं ज्याची तुम्ही कल्पनाही करु शकत नाही. नोकरी मिळवण्यासाठी या पठ्ठ्याने नामी शक्कल लढवली.

२४ वर्षीय क्रिस हार्किन याने वारंवार नोकरीसाठी अप्लाय केलं. मात्र त्याला एकाच आठवड्यात ३०० रिजेक्शनचा सामना करावा लागला. वारंवार रिजेक्ट (Reject) होत असल्याने त्याने भारी शक्कल लढवली. त्याने नोकरी मिळवण्यासाठी शहरभर होर्डिंग (Billboard) लावले. यासाठी त्याने तब्बल ४० हजार रुपये खर्च केले. या बोर्डावर त्याने आपल्या फोटोसह लिहिलं आहे की, 'प्‍लीज हायर मी' (Please Hire me). म्हणजे मला कामावर घ्या. या बिलबोर्डावर तरुणाने स्वत:विषयी ३ पॉइंट्सही लिहिले आहेत. हे तीन पॉईंट्स असे की तो ग्रज्युएट (university graduate)आहे. अनुभवी लेखक (experienced writer) आहे आणि कंटेट क्रिएटर (content creator) आहे. सोबत त्याने त्याच्या युट्युब चॅनलचे नावही लिहिले होते.

जॉब मिळविण्यासाठी होर्डिंग वा बिलबोर्ड लावण्याची ही आयडीया क्रिसला आपल्या बहिणीसोबत चर्चा करताना सुचली. त्याची बहीण सोशल मीडिया मॅनेजर आहे आणि एका कॅम्पेनसाठी बिलबोर्ड बनवण्याचे काम करत होती. मात्र, दुर्दैव म्हणजे बिलबोर्डासाठी ४० हजार रुपये खर्च करून देखील तरुणाला नोकरी काही मिळाली नाही.

Web Title: unemployed youth rejected 300 times spends 40 thousand for billboard gets no job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.