पतीच्या बॅगमध्ये अचानक सापडलं कंडोम, समोर आली विचित्र सवय अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 18:33 IST2022-01-08T18:31:43+5:302022-01-08T18:33:33+5:30

महिलेने म्हटले आहे की, त्यांच्या लग्नाला 17 वर्षं झाली आहेत. महिलेचे वय 46 वर्ष असून तिचा पती 44 वर्षांचा आहे. त्यांना 14 वर्षांचा मुलगाही आहे.

UK woman Suddenly found condom in husbands pocket then came to know about his strange addiction | पतीच्या बॅगमध्ये अचानक सापडलं कंडोम, समोर आली विचित्र सवय अन् मग...

पतीच्या बॅगमध्ये अचानक सापडलं कंडोम, समोर आली विचित्र सवय अन् मग...

ब्रिटनमधील एका महिलेने लग्नाच्या 17 वर्षांनंतर, आपल्या पतीसंदर्भात धक्कादायक खुलासा केला आहे. आपल्या पतीला इतर महिलांमध्ये रस आहे. तो सेक्स अ‍ॅडिक्ट आहे. तो बरे झाल्याचा दावा करत असला तरी, अजूनही अनोळखी महिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो, असे या महिलेने म्हटले आहे.

लग्नाला झाली आहेत 17 वर्ष -
द सनने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेला वाटते की तिचा पती तिच्यापासून समाधानी नाही. महिलेने म्हटले आहे की, त्यांच्या लग्नाला 17 वर्षं झाली आहेत. महिलेचे वय 46 वर्ष असून तिचा पती 44 वर्षांचा आहे. त्यांना 14 वर्षांचा मुलगाही आहे.

पतीने अनेक वेळा दिला धोका -
महिलेने म्हटले आहे, की आपला पती सेक्स अ‍ॅडिक्ट आहे. लग्नापूर्वीही त्याचे अनेक महिलांशी संबंध होते. एवढेच नाही, तर आपल्या पतीने याच कारणासाठी आपल्याशी लग्न केले, असेही तिला वाटते. लग्नाच्या सुरुवातीच्या काळातही पतीने तिची दोन-तीन वेळा फसवणूक केली. मात्र, तिने दर वेळी त्याला माफ केले, असेही तिचे म्हणणे  आहे.

बॅगमध्ये सापडलं कंडोम -
पाच वर्षांपूर्वी महिलेला तिच्या पतीच्या बॅगेमध्ये कंडोम सापडले होता. यानंतर दोघांमध्ये प्रचंड भांडण झाले. तेव्हा पुन्हा कधीच असे होणार नाही, असे आश्वासन पतीने दिले होते. मात्र, त्याने असे का केले? याचे स्पष्टीकरण दिले नाही.

पुन्हा एस्कॉर्ट्सच्या शोधात -
यानंतर, पती सेक्स अ‍ॅडिक्ट असल्याने त्याचे समुपदेशन करण्यात आले. अनेक वर्षे त्यांच्यावर उपचार सुरू होते. महिलेला वाटले, की तो ठीक झाला आहे. महिलेने सांगितले की, 'यानंतरही मी त्याच्यावर लक्ष ठेवण्याची सवय बदलली नाही. पण, त्याने पुन्हा एस्कॉर्ट्स शोधण्यास सुरुवात केली असल्याचे मला दिसून आले आहे.'

Web Title: UK woman Suddenly found condom in husbands pocket then came to know about his strange addiction