व्यक्तीच्या पार्श्वभागात अडकला बॉम्ब, हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी बोलवलं बॉम्ब स्क्वॉड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 17:33 IST2021-12-04T17:31:53+5:302021-12-04T17:33:54+5:30
UK Weird News : बेशुद्धावस्थेत तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला तर बघून डॉक्टरही चक्रावून गेले. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत बॉम्ब डिफ्यूज करण्यासाठी बॉम्ब स्क्वॉडला बोलवण्यात आलं. चला जाणून घेऊ काय आहे ही भानगड....

व्यक्तीच्या पार्श्वभागात अडकला बॉम्ब, हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी बोलवलं बॉम्ब स्क्वॉड
जगभरात दररोज एकापेक्षा एक विचित्र घटना घडत असतात. काही हैराण करणाऱ्या तर काहींवर विश्वासच बसत नाही. अशीच एक घटना ब्रिटनमधून (UK) समोर आली आहे. इथे एका व्यक्तीच्या पार्श्वभागात बॉम्ब फसला होता. बेशुद्धावस्थेत तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला तर बघून डॉक्टरही चक्रावून गेले. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत बॉम्ब डिफ्यूज करण्यासाठी बॉम्ब स्क्वॉडला बोलवण्यात आलं. चला जाणून घेऊ काय आहे ही भानगड....
या व्यक्तीच्या पार्श्वभागातून काढण्यात आलेला बॉम्ब वर्ल्ड वॉर २ (World War 2 explosive) मधील असल्याचं सांगितलं जात आहे. रिपोर्टनुसार, ही व्यक्ती वर्ल्ड वॉर २ म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील एका टॅंकच्या गोळ्यावर पडली होती. या घटनेत टॅंकच्या गोळ्याचा टोकदार भाग त्याच्या पार्श्वभागात फसला.
बेशुद्धावस्थेत या व्यक्तीला हॉस्पिटलमद्ये दाखल केलं. पण प्रायव्हेट पार्टमध्ये अडकलेला बॉम्ब पाहून ग्लॉसेस्टरशायर रॉयल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी बॉम्ब स्क्वॉडला बोलवलं. मात्र, त्याआधीच बॉम्ब काढण्यात आला होता. आणि या व्यक्तीवर उपचारही सुरू करण्यात आले होते. असं सांगण्यात आलं की, बॉम्ब निष्क्रिय होता आणि तो ब्लास्ट होण्याचा कोणताही धोका नव्हता.
प्रायव्हेट पार्टमध्ये कसा फसला बॉम्ब?
'द सन' च्या रिपोर्टनुसार, ही व्यक्ती ब्रिटीश आर्मीची माजी सदस्य होती. त्याला जुन्या काळातील शस्त्रास्त्रे जमा करण्याची आवड होती. वर्ल्ड वॉर-२ वेळच्या एका अॅँटीक गोळ्यालाही त्याच्या शस्त्रागारात ठेवलं होतं. पण काही दिवसांपूर्वी साफसफाई दरम्यान त्याचा पाय घसरला आणि तो थेट टॅंकच्या गोळ्यावर पडला. ज्यामुळे बॉम्बचा टोकदार भाग त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फसला.
त्यानंतर वेदनेने ओरडत असलेल्या व्यक्तीला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. इथे डॉक्टरांनी बॉम्ब स्क्वॉडला बोलवलं. आता उपचारानंतर या व्यक्तीची स्थिती चांगली आहे. त्याला हॉस्पिटलमधून सुट्टीही देण्यात आली आहे.
हॉस्पिटलच्या एका प्रवक्त्याने सांगितलं की, त्यांनी केसची गंभीरता लक्षात घेता सुरक्षा प्रोटोकॉलचं पालन केलं होतं आणि बॉम्ब स्क्वॉडला बोलवलं होतं. या केसमुळे हॉस्पिटलमधील कर्मचारी, रूग्ण किंवा त्यांच्यासोबच्या लोकांना कोणताही धोका नव्हता.