बाबो! कंपनीने बनवली कमाल चादर, आता बेडवर पार्टनरकडून शिव्या खाव्या लागणार नाहीत; कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 05:36 PM2021-10-01T17:36:50+5:302021-10-01T17:38:14+5:30

Bed Sheet That Filters Farts: जर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत बेडवर झोपत असाल आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल म्हणजे तुमचं पोट साफ होत नसेल तरीही तुमचा पार्टनर तुमच्यावर नाराज होणार नाही.

UK : Bedsheet that filters out farts know how | बाबो! कंपनीने बनवली कमाल चादर, आता बेडवर पार्टनरकडून शिव्या खाव्या लागणार नाहीत; कारण....

बाबो! कंपनीने बनवली कमाल चादर, आता बेडवर पार्टनरकडून शिव्या खाव्या लागणार नाहीत; कारण....

Next

यूनायटेड किंगडमच्या लंडनमधून एक अजब बातमी समोर आली आहे. इथे एका कंपनीने अशी चादर बनवली आहे जी पादण्याच्या (Fart Smell) दुर्गंधीला फील्टर करते. कंपनीने प्रवक्ता म्हणाले की, जर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत बेडवर झोपत असाल आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल म्हणजे तुमचं पोट साफ होत नसेल तरीही तुमचा पार्टनर तुमच्यावर नाराज होणार नाही. कारण अशावेळी जर तुम्ही गॅस सोडला तर ही स्पेशल चादर दुर्गंधी फील्टर करेल (Bed Sheet That Filters Farts) आणि दुर्गंधीच येणार नाही.

दुर्गंधी कशी दूर करेल 'फॅंटम' चादर?

'द सन'मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, या फॅंटम चादरच्या मायक्रो फायबर्समध्ये कार्बन पॅनल लावले आहेत जे दुर्गंधी दूर करतात. ही चादर अंगावर घेऊन झोपल्याने गॅसच्या दुर्गंधीमुळे तुम्हाला कोणतीही समस्या होणार नाही. 

गॅसची दुर्गंधी दूर करणारी ही स्पेशल चादर डबल, किंग आणि सुपर किंग अशा तीन साइजमध्ये येते. कंपनीने स्पेशल चादरीशिवाय दुर्गंधी बेअसर करण्यासाठी ब्लॅंकेटही बनवले आहेत.  

किती आहे चादरीची किंमत?

दुर्गंधी दूर करणाऱ्या या स्पेशल चादरीची किंमत १२५ यूरो म्हणजे १० हजार ७५५ रूपयांपासून ते २०० यूरो म्हणजे १७ हजार २१० रूपयांपर्यंत आहे. ही स्पेशल चादर अंडरविअर बनवणाऱ्या एका कंपनीने बनवली आहे. 

कंपनीच्या प्रवक्ता रेबेक्का जोन्स म्हणाल्या की, झोपेवेळी गॅसच्या दुर्गंधीमुळे तुमचा पार्टनर तुमच्यावर नाराज होऊ शकतो. पण आता आम्ही एक असं प्रॉडक्ट आणलं आहे ज्याने बेडमध्ये असताना तुम्हाला लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागणार  नाही. स्पेशल चादर दुर्गंधी दूर करेल.
 

Web Title: UK : Bedsheet that filters out farts know how

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.