शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अनोखं आयलॅंड जिथे राहतात जुळे लोक, कुणालाही माहीत नाही यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 14:02 IST

गावात बरेच जुळे लोक आहेत, इतके की जगात इतके कुठेच नसतील. हीच या आयलॅंडची खासियत आहे. जर तुम्ही या आयलॅंडवर पोहोचले तर हे नक्कीच की, तुम्ही या लोकांना बघून चक्रावून जाल.

(Philippines Island of Twins) जुळे लोक नेहमीच सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतात. जेव्हा ते गर्दीत निघतात तेव्हा लोक त्यांना वळून वळून बघतात. कारण जुळ्यांना बघणं एक वेगळाच अनुभव असतो. आज आम्ही तुम्हाला फिलिपिन्सच्या एका अशा आयलॅंडबाबत सांगत आहोत, जिथे जुळ्या लोकांची संख्या जास्त आहे. मजेदार बाब  म्हणजे इथे प्रत्येक तिसऱ्या घरात जुळे लोक राहतात.फिलिपीन्सच्या आयलॅंडवर असलेलं गाव अलबाट मासेमारीसाठी ओळखलं जातं. सोबतच आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठीही हे ठिकाण प्रसिद्ध आहे. गावात बरेच जुळे लोक आहेत, इतके की जगात इतके कुठेच नसतील. हीच या आयलॅंडची खासियत आहे. जर तुम्ही या आयलॅंडवर पोहोचले तर हे नक्कीच की, तुम्ही या लोकांना बघून चक्रावून जाल.

द सन वेबसाइटच्या एका रिपोर्टनुसार, अलबाटमध्ये १५ हजार परिवार राहतात. ज्यातील जुळ्या लोकांच्या साधारण १०० जोड्या आहेत. हैराण करणारी बाब म्हणजे या गावात असं का होतं हे कुणालाच माहीत नाही. इथे ४ महिन्यांच्या बाळापासून ते ८६ वर्षाचे जुळे वयोवृद्धही दिसतात.

गावात राहणाऱ्या एंटोनिया नावाच्या महिलेने वेबसाइटला सांगितलं की, जेव्हा सरूवातीला तिचं लग्न झालं होतं तेव्हा तिचा पती तिच्यात आणि तिच्या बहिणीत कन्फ्यूज झाला होता. अनेकदा तर असंही झालं की, ज्यामुळे दोघांनाही लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागला. तेव्हा एंटोनियाने पतीला सांगितलं होतं की, तिच्या नाकावर एक तीळ आहे तर तिच्या बहिणीच्या नाकावर तीळ नाही. 

इथे राहणारे जुळे लोक कपड्यांमुळेही एकसारखे दिसतात. ते नेहमीच एकसारखे कपडे घालतात. रिपोर्टनुसार, येथील महिलांना प्रजनन शक्ती वाढवण्यासाठी खास औषधांचं सेवन केलं होतं. ज्यानंतर १९९६ ते २००६ पर्यंत ३५ वर्षापर्यंतच्या महिलांमध्ये मल्टिपल प्रेग्नेन्सीमध्ये १८२ टक्क्यांनी वाढ झाली होती. अजून इथे कोणत्याही प्रकारचा वैज्ञानिक शोध करण्यात आला नाही, ज्यावरून हे समजेल की, इथे इतके जुळे जन्माला का येतात. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स