ड्रायव्हरच्या हुशारीने टळला मोठा अपघात, भरधाव ट्रक येताच केले असे काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 18:49 IST2021-09-01T18:48:21+5:302021-09-01T18:49:08+5:30

Truck Car viral video: एक सेंकदही उशीर झाला असता, तर खूप मोठा अपघात झाला असता.

Truck Car hihway accident viral video, driver's cleverness averted a big accident | ड्रायव्हरच्या हुशारीने टळला मोठा अपघात, भरधाव ट्रक येताच केले असे काही...

ड्रायव्हरच्या हुशारीने टळला मोठा अपघात, भरधाव ट्रक येताच केले असे काही...

नवी दिल्ली: अनेक वेळा महामार्गावर केलेली एक छोटीशी चूक आयुष्यासाठी खूप मोठी ठरते. तुम्ही अशा अनेक बातम्या वाचल्या आणि ऐकल्या असतील, ज्यात ड्रायव्हरची एक छोटीशी चूक गंभीर अपघातांना कारणीभूत ठरते. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

ट्विटरवर एका महामार्गावरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अमेरिकेचा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये महामार्गावर अनेक वाहने थांबलेली दिसत आहेत. यावेळी अचानक भरधाव वेगाने चालणारा ट्रक एका कारच्या बाजुने निघून जातो. हा ट्रक इतक्या वेगात असतो की, कार थोडी बाजुला झाली नसती, तर खूप मोठा अपघात झाला असता. त्या कारच्या मागे असलेल्या कारमधील व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केला आहे.

ड्रायव्हरने अचानक कार वळवली
या भरधाव ट्रकने कारला उडवले असते तर खूप मोठा अपघात झाला असता. पण, ही ट्रक कारच्या अगदी जवळ येताच त्या कारच्या ड्रायव्हरने अचानक आपली कार उजव्या बाजुला वळवली, त्यामुळे खूप मोठा अपघात टळला. त्या कारच्या ड्रायव्हरने कारच्या काचेतून भरधाव येणारी ट्रक पाहिली असेल, असा अंदाज लावला जात आहे.
 

Web Title: Truck Car hihway accident viral video, driver's cleverness averted a big accident