मैत्रिणीचा जीव वाचवण्यासाठी महिलांनी केलं न्यूड फोटोशूट, जमवले उपचाराचे पैसे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 11:28 IST2024-12-16T11:27:08+5:302024-12-16T11:28:14+5:30
इथे एका महिलेने आपल्या १६ मैत्रिणींसोबत मिळून न्यूड कॅलेंडर तयार केलं. याद्वारे ३२ लाख रूपये गोळा करण्याचा उद्देश होता. जेणेकरून एका दुर्मिळ आजाराने पीडित मैत्रिणीवर उपचार करता यावे.

मैत्रिणीचा जीव वाचवण्यासाठी महिलांनी केलं न्यूड फोटोशूट, जमवले उपचाराचे पैसे!
असं म्हणतात की, जेव्हा एखादा मित्र अडचणीत असतो तेव्हाच मैत्रिची खरी परीक्षा असते. खरी मैत्री दाखवणारी एक भावूक करणारी घटना ब्रिटनमधून समोर आली आहे. इथे एका महिलेने आपल्या १६ मैत्रिणींसोबत मिळून न्यूड कॅलेंडर तयार केलं. याद्वारे ३२ लाख रूपये गोळा करण्याचा उद्देश होता. जेणेकरून एका दुर्मिळ आजाराने पीडित मैत्रिणीवर उपचार करता यावे.
इंग्लंडच्या साल्टाशमध्ये राहणाऱ्या ३२ वर्षीय जेसिका रिग्सला न्यूरो-क्रॅनियो-वर्टेब्रल सिंड्रोम नावाचा आजार आहे. या आजारा पाठीच्या मणक्याशी जुळलेल्या फायबर्सवर अधिक दबाव पडतो. त्यामुळे जेसिकाला पॅरालिसीस होऊ शकतो.
जेसिकाने सांगितलं की, या आजारावर उपचार घेण्यासाठी तिला स्पेनला जावं लागेल. जिथे या आजारासाठी खास उपचार आहे. पण त्यासाठी ३२ लाख रूपये खर्च आहे. जे गोळा करणं सोपं काम नव्हतं. अशात तिला एक आयडिया सुचली.
जेसिकाने सांगितलं की, तिच्या मैत्रिणींनी गमतीत म्हटलं होतं की, 'आम्हाला न्यूड राहणं पसंत आहे'. या गोष्टीने प्रेरित होऊन जेसिकाने कॉमेडी ड्रामा सिनेमा 'कॅलेंडर गर्ल्स'मधून आयडिया घेतली. आपल्या १६ मैत्रिणींसोबत न्यूड पोज देत एक कॅलेंडर बनवलं आणि ते विकून पैसे गोळा केले. यातून आतापर्यंत तिने २१ लाख रूपये जमवले. कॅलेंडर अजून पब्लिश झालं नाही. पण सोशल मीडिया याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
जेसिकाने मिरर न्यूजसोबत बोलताना सांगितलं की, 'ही काही केवळ पैसे जमवण्याची एक पद्धत नव्हती. मला वाटतं की, लोकांना यातून हे शिकायला मिळेल की, हे स्वातंत्र्य आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे'.
जेसिकाने सांगितलं की, २२ व्या वर्षी या आजाराची लक्षणं दिसणे सुरू झाली होती. अनेक डॉक्टर आणि न्यूरोलॉजिस्टना भेटूनही या आजाराचं कारण समजू शकलं नाही. हळूहळू तिची तब्येत आणखी बिघडू लागली आणि तिला मरीन बायोलॉजिस्ट व पोलर एक्सपीडिशन गाइटसारखी नोकरी सोडावी लागली.