शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! पत्नीच्या टीकटॉक व्हिडीओंना कंटाळला पती, थेट घटस्फोटासाठी गेला कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 12:37 IST

आजकाल सगळ्याच ठिकाणी टीकटॉकचा क्रेज पहायला मिळतो

आजकाल सगळ्याच ठिकाणी टीकटॉकचा क्रेज पहायला मिळतो. प्रसिध्दी मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा तुफान वापर केला जातो. याचे अनेक दुष्परिणाम सुद्धा आहेत.  सोशल मिडीयामुळे अनेक नाती तुटत असल्याचं तुम्ही ऐकलं असेल. आज  आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहोत. 

ही घटना गाझियाबाद येथील आहे. याठिकाणी एका पतीने आपल्या पत्नीकडे घटस्फोटाची मागणी केली आहे. याचे कारण ऐकून तुम्ही हैराण व्हाल. कारण त्या व्यक्तीची पत्नी मोबाईलवर सतत टिकटॉकचा वापर करत असल्यामुळे त्याने नातं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. या मुलाचे असे म्हणणे आहे की सोशल मीडियाच्या अतिवापराच्या त्याच्या कुटूंबावर परिणाम होत आहे. सोशल मीडियावर जास्त वेळ घालवल्यामुळे व्यक्ती आपल्या कुटूंबाला वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे घरातील वातावरण अनूकुल राहत नाही. तसंच जर कम्यूनिकेशन गॅप जास्त असेल तर नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. 

सोशल मीडियाचं व्यसन लागल्यानंतर  फिलिंग्स शेअर करण्यासाठी किंवा पार्टनर सोबत वेळ घालवण्यासाठी जास्त वेळ उपलब्ध होत नाही. त्यामुळे पती किंवा पत्नीच्या आयुष्यात असुरक्षिततेची भावना यायला सरूवात होते.  तसंच आपल्या पार्टनरला असं सुद्धा वाटू शकतं की तुमच्यासाठी मोबाईल सगळं काही असून मोबाईला तुम्ही जास्त वेळ देत आहात. यामुळे पार्टनरसोबत वारंवारं भांडण होऊन नातं तुटू शकतं. किंवा तुमचा पार्टनर तुमच्या बाबतीत असंवेदनशील सुद्धा होऊ शकतो.  एकमेकांमध्ये संवादाचा अभाव असणे. असुरक्षितता वाटणे अशा गोष्टींमुळे तुमच्या आणि तुमच्या पार्टनरच्या नात्यातील ताण वाढण्याची शक्यता असते. मग  नंतर दोघं ही आपल्या नात्याला डोकदुखी समजायला लागतात. 

(image credit- readers digest)

अनेक अशा घटना समोर आल्या आहेत. ज्यामध्ये अनेकदा  समजावून सांगितल्यावरही  पती पत्नी सोशल मीडियावर अधिक वेळ घालवतात.  गाझियाबादच्या या घटनेत गरजेपेक्षा जास्त पार्टनर सोशल मीडीयावर एक्टीव्ह राहिल्यामुळे पार्टनरला हा निर्णय घ्यावा लागला. याबाबत या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या विरोधात कोर्टात  याचीका दाखल केली आहे. सध्याच्या काळात सोशल मीडियाच्या चुकिच्या वापरामुळे लोकांची नाती तुटतात. पण त्यांना या गोष्टींची जराही खंत वाटत नसते. याचा अर्थ असा होतो की सोशल मीडियावर अधिक वेळ घालवण्याइतकी नाती मह्त्वाची वाटत नाहीत. ( हे पण वाचा-म्हणून गर्लफ्रेंड तुमचा फोन चेक करते, जाणून घ्या फोन चेक करण्यापासून रोखण्याचा खास फंडा....)

(image credit- readers digest)

सोशल मीडियाचा अधिक वापर  करून जास्त विव्ज आणि प्रसिध्दी  मिळवण्याकरिता लोकं काहीही करू शकतात. त्याचा वाईट परिणाम नात्यांवर होऊन नकळतपणे तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागू शकते. जर तुमच्या बाबतीत सुद्धा असंच घडत असेल तर तुम्हाला कांऊन्सलिंग करण्याची गरज आहे.  तुमच्या बाबतीत असं होऊ नये म्हणून सोशल मीडियाचा अतिवापर करणं टाळा आणि आपल्या घरच्या व्यक्तींना किंवा पार्टनरला जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा. ( हे पण वाचा-पार्टनरसोबत डेटला जायचयं पण बजेट कमी? 'या' टीप्स वापराल स्वस्तात मस्त होईल डेट)

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाTik Tok Appटिक-टॉकrelationshipरिलेशनशिप