कारवर हल्ला करुन वाघाने आपल्या जबड्याने ओढली कार, आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 11:38 IST2021-12-31T11:18:58+5:302021-12-31T11:38:13+5:30

वाघाने ओढलेली कार महिंद्रा कंपनीची आहे, त्यामुळेच आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओ शेअर करुन त्यासोबत मजेशीर कॅप्शन लिहीले आहे.

The tiger attacked on car and pulled it by its jaw, Anand Mahindra shared the video | कारवर हल्ला करुन वाघाने आपल्या जबड्याने ओढली कार, आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडिओ

कारवर हल्ला करुन वाघाने आपल्या जबड्याने ओढली कार, आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडिओ

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक वाघ आपल्या जबड्याने SUV कारचा बंपर ओढत आहे. तसेच, वाघ आपल्या जबड्याने गाडी सुमारे 3 ते 4 फूट खेचतो. यादरम्यान कारमध्ये बसलेल्या लोकांमध्ये उत्साह आणि भीतीचे वातावरण पसरते.  हा व्हिडिओ महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. यासोबत त्यांनी महिंद्रा कंपनीची वाहने स्वादिष्ट आहेत, असे मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे.

वाघाने एसयूव्ही जबड्याने पकडली आणि मागे खेचली

आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले की, 'उटी ते म्हैसूरच्या रस्त्यावर थेप्पाकडूजवळ हे दृश्य दिसले. व्हिडिओमध्ये वाघ जी कार खेचत आहे ती महिंद्रा झायलो आहे. कदाचित माझ्याप्रमाणेच वाघाचाही असा विश्वास असेल की, महिंद्राच्या गाड्या स्वादिष्ट असतात',असे कॅप्शन त्यांनी लिहीले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ सुमारे दीड मिनिटांचा आहे. कारमध्ये सहा जण होते असे सांगण्यात येत आहे. कारची बॅटरी अचानक डिस्चार्ज झाल्याने कार सुरू होत नव्हती. तेवढ्यात वाघ येतो आणि गाडीला खेचतो, तेथून जाणाऱ्या काही पर्यटकांनी हा व्हिडिओ शूट केला. व्हायरल झालेला व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून मजेशीर कमेंटही करत आहेत. 
 

Web Title: The tiger attacked on car and pulled it by its jaw, Anand Mahindra shared the video