आतापर्यंत १०० मुलांचा बाप बनलाय हा तरुण, लवकरच बनवणार वर्ल्ड रेकॉर्ड, याबाबत म्हणतो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 15:33 IST2025-01-15T15:33:40+5:302025-01-15T15:33:57+5:30
Jara Hatke News: अमेरिकेतील काइल गॉर्डी हा ३२ वर्षीय तरुण आतापर्यंत १०० मुलांचा बाप बनला आहे. ऐकायला जरा विचित्र वाटलं तरी ही बाब खरी आहे. तसेत त्याने ही कामगिरी कशी साध्य केलीय हे आपण जाणून घेऊयात.

आतापर्यंत १०० मुलांचा बाप बनलाय हा तरुण, लवकरच बनवणार वर्ल्ड रेकॉर्ड, याबाबत म्हणतो...
अमेरिकेतील काइल गॉर्डी हा ३२ वर्षीय तरुण आतापर्यंत १०० मुलांचा बाप बनला आहे. ऐकायला जरा विचित्र वाटलं तरी ही बाब खरी आहे. तसेत त्याने ही कामगिरी कशी साध्य केलीय हे आपण जाणून घेऊयात. त्याचं आहे असं की, काइल गॉर्डी हा जगातील प्रसिद्ध स्पर्म डोनर आहे. तसेच आतापर्यंत तो जगभरातील ८७ मुलांचा जैविक पिता बनला आहे. तसेच २०२५ च्या सुरुवातीला आपलं कुटुंब आणखी विस्तारणार असल्याची माहिती त्याला मिळाली आहे. तो आता १०० मुलांचा बाप बनण्याच्या उंबरठ्यावर आहे.
येणाऱ्या काही महिन्यात अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे राहणाऱ्या काइल याच्या मुलांची संख्या ही १००च्या पुढे पोहोचण्याची शक्यता आहे. हा रेकॉर्ड याआधी केवळ ३ पुरुषांनाच साध्य करता आला आहे. या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचल्यानंतरही काइस याने स्पर्म डोनेट करणं बंद करण्याचा आपला कुठलाही इरादा नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
काइल हा ‘बी प्रेग्नंट नाऊ’ या नावाच्या वेबसाइटच्या माध्यमातून आपली मोफत सेवा पुरवतो. येत्या काही दिवसांत तो इंग्लंड, स्कॉटलंड, स्वीडन आणि नॉर्वेमधील १४ मुलांचा बाप बनणार आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे हजारो फॉलोअर्स आहेत. आपल्या या अनुभवाबाबत काइल सांगतो की, एवढ्यया मुलांचा पिता बनणं हा खरंच शानदार अनुभव आहे. ज्या महिलांना आपण माता बनू शकू असं वाटत नव्हतं. त्यांना कुटुंब सुरू करण्यास मदत केल्याचा मला आनंद आहे.