मृत प्राण्यांच्या अवशेषांचा असा उपयोग करते महिला, कसा ते वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 13:28 IST2024-05-01T13:15:16+5:302024-05-01T13:28:40+5:30
40 वर्षीय एमिली उलसियसने एकदा एका रिसर्च सेंटरमध्ये काम केलं होतं. इथे ती मृत प्राण्यांच्या सॅंपल्सचं विश्लेषण करत होती.

मृत प्राण्यांच्या अवशेषांचा असा उपयोग करते महिला, कसा ते वाचून व्हाल अवाक्...
एखाद्या फ्रिजमध्ये जर एखाद्या व्यक्तीचा मृतदेह ठेवला असेल किंवा काही प्राण्यांचे अवशेष ठेवले असेल तर सहाजिक काही लोकांना भीती वाटू शकते. सामान्यपणे असं करणारे सायको समजले जातात. पण एका महिलेने तर याचा व्यवसाय सुरू केलाय. महिलेने सांगितलं की, तिच्याकडील फ्रिजमध्ये मृत प्राण्यांचे अवशेष भरून ठेवले आहेत.
महिलेने सांगितलं की, ती या वेगवेगळ्या जीवांच्या अवशेषांचा उपयोग वेगळ्या प्रकारचे आर्ट बनवण्यासाठी आणि ऑनलाईन विकण्यासाठी करते. न्यूयॉर्कच्या लॉंग आयलॅंडवर राहणारी 40 वर्षीय एमिली उलसियसने एकदा एका रिसर्च सेंटरमध्ये काम केलं होतं. इथे ती मृत प्राण्यांच्या सॅंपल्सचं विश्लेषण करत होती. हे सॅंपल्स दान केलेले असायचे.
जास्तीत जास्त जीवांचे अवशेष फ्रीझरमध्ये पडून असायचे. ज्यामुळे तिथे अवशेष खूप जास्त जमा व्हायचे. आता नोकरी सोडून तिथे शिकलेल्या काही गोष्टींचा वापर करून एमिली अवशेष खराब होण्यापासून वाचवते आणि त्यांना सन्मान देण्यासाठी अशा मृत जीवांच्या अवशेषांना आर्टमध्ये बदलत आहे.
एमिली म्हणाली की, 'एकतर मला प्राण्यांच्या अवशेषांचा उपयोग करण्याची पद्धत शोधावी लागेल किंवा ते फेकून द्यावे लागतील. पण मी ते फेकून देऊ शकत नाही. ही माझ्यासाठी या जीवांना श्रद्धांजली देण्याची एक पद्धत आहे. आता सडण्याऐवजी ते नेहमी सुंदर आणि संरक्षित राहतील'.
महिलेच्या या नव्या बिझनेसमध्ये ती आता साप आणि इतर जीवांचे अवशेष काचेच्या जारमध्ये किंवा सेंटच्या बॉटलमध्ये भरून ठेवते. तसेच हाडांपासून चाव्या आणि दागिने बनवते. ती आला ऑनलाईन लोकांना आपले आर्ट विकत आहे.
एमिली ला फॉर्मेलिन-फिक्स्ड वेट स्पेसीमेन प्रिजर्वेशनचं काम चांगलं जमतं आणि सोशल मीडियावर तिचा बिझनेसचा प्रवास शेअर करत असते. तिच्या सगळ्यात जास्त बघण्यात आलेल्या व्हिडीओला 2.8 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. लोक तिच्या व्हिडीओ कमेंट करून आपल्या प्रतिक्रियाही देतात.