शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चोरांनी दुकानात चोरी केली, सत्य समजल्यावर परत केलं साहित्य; चिठ्ठीत लिहिलं - आमची चूक झाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 11:10 IST

चोरी केल्यावर चोरांनी त्यांचं सामान तर परत केलंच सोबतच एक चिठ्ठीही लिहिली आणि त्यात माफी मागितली. सध्या या घटनेची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 

उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) चोरीची एक अजब घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यात चोरांनी एका गरीब घरात चोरी केली. पण त्यानंतर त्यांनी जे केलं ते पाहून सगळेच भावूक झाले. चोरी केल्यावर चोरांनी त्यांचं सामान तर परत केलंच सोबतच एक चिठ्ठीही लिहिली आणि त्यात माफी मागितली. सध्या या घटनेची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, बांदा जिल्ह्यातील चन्द्रायल गावात राहणारा दिनेश तिवारी गरीब घरातील आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ४० हजार रूपये कर्ज घेऊन वेल्डिंगचं दुकान सुरू केलं होतं. दररोज प्रमाणे २० डिसेंबरच्या सकाळी तो दुकानाता पोहोचला तर त्याला धक्का बसला. त्याच्या दुकानाचं लॉक तुटलेलं होतं. दुकानातील सर्व साहित्य चोरी झालं होतं. त्यानंतर त्याने पोलिसांना सूचना दिली.

तो पोलीस स्टेशनमध्ये गेला तेव्हा तिथे कुणीही नव्हतं म्हणून तो तक्रार दाखल करू शकला नाही. घटनेच्या दोन दिवसांनंतर त्याला कुठूनतरी समजलं की, त्याच्या दुकानातील चोरी झालेलं साहित्य गावातील एका ठिकाणी पडून आहे. चोर त्याचं साहित्य ठेवून गेले होते. चोरी केल्यावर चोरांना समजलं की, दिनेश तिवारी फार गरीब आहे त्यामुळे त्याना वाईट वाटलं. ते फार इमोशनल झाले होते. त्यामुळे चोरांनी एक चिठ्ठी लिहून दिनेश तिवारीची माफीही मागितली.

चोरांनी चिठ्ठीत लिहिलं की, 'हे दिनेश तिवारीचं साहित्य आहे. आम्हाला एका व्यक्तीकडून तुझ्याबाबत समजलं. आम्ही केवळ त्याल ओळखतो ज्याने लोकेशन दिलं म्हणाला होता की, तू काही सामान्य माणूस नाही. पण जेव्हा आम्हाला समजलं तेव्हा दु:खं झालं. त्यामुळे तुझं साहित्य परत करतो. चुकीच्या लोकेशनमुळे आमच्याकडून चूक झाली'. 

दुसरीकडे साहित्य परत मिळाल्याने दिनेश तिवारी आनंदी आहे. त्याने सांगितलं की, चोरांनी त्याच्या दुकानातून दोन वेल्डींग मशीन, १ कटर मशीन, १ वजन काटा, १ ग्लेंडर आणि २ ड्रिल मशीन चोरी केली होती. आता चोरांनी माझं सगळं साहित्य परत केलं आहे आणि त्यासोबत एक चिठ्ठीही आहे. ज्यात लिहिलं आहे की, त्यांनी चुकून चोरी केली.  तो म्हणाले की, मला माझं साहित्य परत मिळालं मी यातच आनंदी आहे. देवाने माझा रोजगार वाचवला.' 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारी