तरूणाने घातला 20 लाख रूपयाच्या नोटांचा हार, लोक म्हणाले - आधी घर प्लास्टर कर भावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 12:21 PM2023-11-22T12:21:32+5:302023-11-22T12:22:07+5:30

Viral Video : असं मानलं जात आहे की, हा काही लग्नात घातलेला हार नाही. तर एका तरूणाने फेमस होण्यासाठी असं केलं.

The boy wore a garland of notes worth Rs 20 lakh | तरूणाने घातला 20 लाख रूपयाच्या नोटांचा हार, लोक म्हणाले - आधी घर प्लास्टर कर भावा!

तरूणाने घातला 20 लाख रूपयाच्या नोटांचा हार, लोक म्हणाले - आधी घर प्लास्टर कर भावा!

Viral Video : तुम्ही अनेकदा लग्नांमध्ये नवरदेवांना नोटांचा हार घातलेलं पाहिलं असेल. या हारात वेगवेगळ्य रूपयांच्या नोटा लावलेल्या असतात किंवा एकाच प्रकारच्या नोटा असतात. पण सध्या सोशल मीडिया एक भलामोठा नोटांचा हार असलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक-दोन लाख नाही तर तब्बल 20 लाख रूपयांच्या नोटा लावल्या आहेत. 

असं मानलं जात आहे की, हा काही लग्नात घातलेला हार नाही. तर एका तरूणाने फेमस होण्यासाठी असं केलं. व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक तरूण घराच्या छतावर उभा आहे. त्याच्या गळ्यात हा भव्य हार आहे जो खाली जमिनीपर्यंत पसरला आहे. या हारात 500 च्या नोटा माळण्यात आल्या आहेत.

हा व्हिडीओ हरयाणाच्या कुरेशीपूर गावातील असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडिओत ज्या तरूणाला नोटांचा हार घातला आहे त्याला बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे. बरेच लोक त्याचा व्हिडीओ काढताना दिसत आहेत. असा दावा केला जात आहे की, या हारामध्ये साधारण 20 लाख रूपये लावण्यात आले आहेत.
हा अवाक् करणारा व्हिडीओ सोशल मीडिया प्लटफॉर्म इंस्टाग्रामवर dilshadkhan_kureshipur नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनला लिहिलंय '20 लाखांचा हार'. या व्हिडिओला आतापर्यंत साधारण 30 लाख लाइक्स मिळाले आहेत.

अनेक लोक यावर मजेदार कमेंट्सही करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'इतके पैसे आहे तर घराला प्लास्टर करून घे'. दुसऱ्याने लिहिलं की, 'आधी घर व्यवस्थित कर', तिसऱ्याने लिहिलं की, 'असं वाटतं ड्रीम 11 मध्ये जिंकला भाऊ', तर एक जण म्हणाला की, 'सगळे शांत रहा, नोटा नकली आहेत'.

Web Title: The boy wore a garland of notes worth Rs 20 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.