दारुच्या नशेत त्यानं चक्क जिवंत कोंबडी फाडून खाल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 17:12 IST2018-08-02T17:09:14+5:302018-08-02T17:12:55+5:30

संपूर्ण प्रकार एका व्यक्तीनं मोबाईलमध्ये कैद केला आहे

Telangana youth eats chicken alive after getting drunk | दारुच्या नशेत त्यानं चक्क जिवंत कोंबडी फाडून खाल्ली

दारुच्या नशेत त्यानं चक्क जिवंत कोंबडी फाडून खाल्ली

महबूबाबाद : दारुचं व्यसन वाईट असतं असं म्हणतात. दारुच्या नशेत असलेला माणूस काय करेल सांगता येत नाही, असंदेखील आपण अनेकदा ऐकतो. दारुच्या नशेत असलेली व्यक्ती काय करु शकते, याचा प्रत्यय तेलंगणात आला आहे. मेहबूबनगरमध्ये दारुच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीनं जिवंत कोंबडी फाडून खाल्ल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार एका व्यक्तीनं मोबाईलमध्ये कैद केला आहे. 

महबूबाबाद जिल्ह्यातील केसमुद्रम भागात एक धक्कादायक प्रकार घडला. या भागात राहणारे दोन तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. यानंतर दोघांना चिकन करी खावीशी वाटू लागली. मग दारुच्या नशेत 'टल्ली'न झालेल्या दोघा तरुणांनी बाजारातून कोंबडी आणली. मात्र दोघे तरुण अतिशय मद्यधुंद अवस्थेत असल्यानं ते चालूदेखील शकत नव्हते. त्यामुळे हे दोन्ही तरुण रस्त्यावर पडले. 

दारुच्या नशेत असलेला दोघांपैकी एक तरुण रस्त्यातच आडवा झाला. मात्र दुसऱ्या तरुणाच्या कृत्यानं सगळ्यांनाच धक्का बसला. दारुच्या नशेत रस्त्यावर बसलेल्या दुसऱ्या तरुणानं चिकन करी करण्यासाठी आणलेली कोंबडी जिवंत खाण्यास सुरुवात केली. त्यानं आधी कोंबडीचे पंख खेचून काढले आणि त्यानंतर दातानं तिचे लचके तोडण्यास सुरुवात केली. त्यानं कोंबडीचं शरीर मधून फाडलं आणि जवळपास निम्मी कोंबडी फस्त केली. हा संपूर्ण रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीनं मोबाईलमध्ये टिपला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
 

Web Title: Telangana youth eats chicken alive after getting drunk