Teenage Love: सुंदर क्लासमेटला इम्प्रेस करण्यासाठी तो शिकला फ्रेंच, पण नंतर समजलं की ती तर होती जर्मन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 19:48 IST2022-01-04T19:48:31+5:302022-01-04T19:48:48+5:30
Teenage Love: टीनएजमधील प्रेम हे जेवढं निरागस असतं, तेवढंच सुंदरही असतं. तेव्हा आपल्या तथाकथित प्रेमाला इम्प्रेस करण्यासाठी हे बालप्रियकर बऱ्याच गमतीजमती करत असतात. अशाच एका प्रकारातून घडलेली गमतीदार घटना समोर आली आहे.

Teenage Love: सुंदर क्लासमेटला इम्प्रेस करण्यासाठी तो शिकला फ्रेंच, पण नंतर समजलं की ती तर होती जर्मन
लंडन - टीनएजमधील प्रेम हे जेवढं निरागस असतं, तेवढंच सुंदरही असतं. तेव्हा आपल्या तथाकथित प्रेमाला इम्प्रेस करण्यासाठी हे बालप्रियकर बऱ्याच गमतीजमती करत असतात. अशाच एका प्रकारातून घडलेली गमतीदार घटना समोर आली आहे. एका ब्रिटिश शालेय विद्यार्थी त्याच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडला. त्यानंतर त्या मुलीला आमप्ला मनातील गोष्ट सांगण्यासाठी तो तिची भाषा म्हणून फ्रेंच भाषा शिकला. मात्र तो ज्या मुलीच्या प्रेमात पडला ती फ्रेंच नसून जर्मन आहे, हे त्याला माहितीच नव्हते.
अशा प्रकारे फजिती झाल्यानंतर सदर मुलाने आपली प्रेमकहाणी सोशल मीडियावर मांडली आहे. त्याने सांगितले की, त्याला शाळेतील एक मुलगी खूप आवडली होती. पण तिच्याबाबत त्याला खूप कमी माहिती होती. त्यामुळे तिला आपल्या मनातील गोष्ट सांगण्यासाठी त्याने मेहनत घेऊन फ्रेंच भाषा शिकून घेतली. जेव्हा त्याला आपण फ्रेंचमध्ये बोलू शकतो याबाबत विश्वास निर्माण झाला तेव्हा तो त्या मुलगीसमोर गेला. मात्र तिथे जे घडले त्यामुळे त्याची चांगलीच फजिती झाली.
मुलाने या घटनेबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, त्याला त्या मुलीबाबत केवळ ती परदेशी आहे, एवढंच माहिती होतं. ती फ्रेंच आहे की जर्मन याबाबत त्याला काहीच माहिती नव्हती. तिला पटवण्यासाठी या मुलाने अनेक महिने मेहनत करून फ्रेंच भाषा शिकली. मात्र जेव्हा तो लकडीजवळ जाऊन त्याने तिला त्याच्या मनातली गोष्ट सांगितली आणि तिच्या प्रतिसादाची वाट पाहू लागला. मात्र तिचं जे उत्तर समोर आले ते फार विचित्र होते.
त्या मुलीने त्या मुलाला फ्रेंच भाषेतच उत्तर दिलं, ती म्हणाली की, तुला माहिती आहे का मी जर्मन आहे? तिचं हे उत्तर ऐकून हा मुलगा खजिल झाला आणि वेगवेगळ्या थापा मारू लागला. त्याने Reddit वर या घटनेबाबत माहिती दिली तेव्हा नेटिझन्स त्यावर वेगवेगळ्या कमेंट करू लागले आहेत. त्यानिमित्ताने तू नवीन भाषा शिकलीस, असं उत्तर एका वाचकानं दिलं आहे. तर एका अन्य युझरने त्याच्या या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे.