जगभरात असा वेगवेगळ्या दिवशी साजरा होतो शिक्षक दिन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 17:06 IST2018-09-05T16:59:19+5:302018-09-05T17:06:25+5:30
देशभरात आज शिक्षक दिवस साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी 5 सप्टेंबरला साजरा करण्यात येणारा हा दिवस शिक्षकांच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येतो.

जगभरात असा वेगवेगळ्या दिवशी साजरा होतो शिक्षक दिन!
देशभरात आज शिक्षक दिवस साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी 5 सप्टेंबरला साजरा करण्यात येणारा हा दिवस शिक्षकांच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येतो. फक्त भारतच नाही तर जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्येही हा दिवस साजरा करण्यात येतो. फक्त प्रत्येक देशात त्याचं महत्त्व आणि त्याप्रती असणाऱ्या भावनांचं महत्त्व वेगळं आहे. त्याचप्रमाणे काही देशांमध्ये 5 तारखेला नाही तर वेगवेगळ्या दिवशी शिक्षक दिन साजरा करण्यात येतो.
1. नेपाळ
नेपाळमध्ये जुलैमध्ये येणारी पौर्णिमा म्हणजेच आषाढ शुक्ल पौर्णिमेला शिक्षक दिवस साजरा होतो. नेपाळमध्ये शिक्षक दिन गुरूपौर्मिमा म्हणूनही साजरा करण्यात येतो.
2. अमेरिका
अमेरिकेमध्ये शिक्षक दिन राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. इथे एक दिवस नाही तर मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात शिक्षक दिन साजरा केला जातो. तर अमेरिकेतील मॅसाच्युरेट्समध्ये जूनच्या पहिल्या रविवारी शिक्षक दिन साजरा केला जातो.
3. पाकिस्तान
पाकिस्तानमध्ये शिक्षक दिन 5 ऑक्टोबर म्हणजे इंटरनेशनल टीचर्स डेच्या दिवशी साजरा करण्यात येतो.
4. अफगानिस्तान
या देशात दरवर्षी 5 ऑक्टोबरला शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. या दिवशी विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात येते. शिक्षक दिनाच्या एक दिवस अगोदर प्रोग्राम ठेवण्यात येतात आणि शिक्षक दिन साजरा करण्यात येतो.
5. ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबरच्या शेवटच्या शुक्रवारी शिक्षक दिवस साजरा करण्यात येतो. तसेच येथील सरकार त्यासाठी त्यांना पुरस्कारही देते.
6. चीन
चीनमध्ये 10 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. या दिवशी सर्व स्टुडंट आपल्या शिक्षकांचे आभार व्यक्त करण्यासाठी स्पेशल प्लॅन करतात.
7. ग्रीस
येथे असलेल्या यूनानी सभ्यतेनुसार, 30 जानेवारीला शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. या दिवशी ग्रीक टीचर्स द ग्रेट, ग्रेगॉरी आणि जॉन क्रायसोस्टम दिल्यानंतरच सन्मानित करण्यात येतात.