'ही' महिला सात वर्षात सात वेळा राहिली गर्भवती, पण सत्य वाचून डोक्याला येईल झिणझिण्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 13:20 IST2019-11-27T13:17:18+5:302019-11-27T13:20:54+5:30
नोकरी करणारे लोक सुट्टी मिळवण्यासाठी नको नको ती कारणे सांगतात हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे.

'ही' महिला सात वर्षात सात वेळा राहिली गर्भवती, पण सत्य वाचून डोक्याला येईल झिणझिण्या!
(Image Credit : thestatesman.com)
नोकरी करणारे लोक सुट्टी मिळवण्यासाठी नको नको ती कारणे सांगतात हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. काही दिवसांपूर्वी एका रिसर्चमधून समोर आलं होतं की, सुट्टीसाठी जास्तीत जास्त कर्मचारी हे आजाराचं कारण सांगतात. हे कारण अनेकदा फायद्याचं ठरतं, पण कधी कधी हे कारण नुकसानकारकही ठरतं. अशात एका शिक्षिकेने सुट्टी मिळवण्यासाठी असं काही कारण सांगितलं जे वाचून तुम्ही हैराण व्हाल.
आपल्या देशात सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी सुट्टीचे अनेक नियम तयार केले आहेत. पण काही लोक असेही असतात जे या सुविधांचा फार चुकीचा वापर करतात. अशीच एक घटना बिहारमध्ये समोर आली आहे. बिहारच्या एका शाळेतील शिक्षिका ७ वर्षात ७ वेळा गर्भवती राहिली.
मुळात हे केवळ एक कारण होतं. महिला शिक्षिका तिला मॅटर्मिटी पेड लीव्स मिळाव्यात म्हणून गर्भवती राहत होती. गेल्या सात वर्षांपासून गर्भवती असल्याचं सांगत ही महिला घरीच बसून होती.
गर्भवती असल्याचं कारण सांगत अनेक वर्ष सुट्टीवर असलेल्या या महिलेवर शाळेतील लोकांना संशय आला. त्यानंतर या प्रकरणाच्या मूळात जाण्यासाठी शाळेने चौकशी केली तेव्हा या कारणाचा खुलासा झाला.
गर्भवती असल्याचं नाटक करणाऱ्या महिलेने सरकारला सात वर्ष फसवत राहिली. आता प्रशासनाने या महिलेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.