कोरोना संपवण्यासाठी लोकांना 'स्वीट-डील' ऑफर; लस घेणाऱ्यास मोफत मिळणार आईस्क्रीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 17:10 IST2021-02-08T16:48:36+5:302021-02-08T17:10:18+5:30
CoronaVaccine News : लसीचे काही प्रमाणात साईड इफेक्ट्स दिसून आल्यामुळे बरेच लोक लस घेण्याआधीच विचार करत आहेत. त्यामुळे लोकांनी लस टोचून घ्यावी यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

कोरोना संपवण्यासाठी लोकांना 'स्वीट-डील' ऑफर; लस घेणाऱ्यास मोफत मिळणार आईस्क्रीम
कोरोनाच्या माहामारीनं करोडो लोकांना आपल्या जाळ्यात ओढलं तर जगभरातील लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाचे लसीकरण कधी सुरू होणार याचीच सगळ्यांना प्रतिक्षा होती. २०२१ च्या सुरूवातीपासूनच जगभरात कोरोनाच्या लसीकरणाला सुरूवात झाली पण लसीचे काही प्रमाणात साईड इफेक्ट्स दिसून आल्यामुळे बरेच लोक लस घेण्याआधीच विचार करत आहेत. त्यामुळे लोकांनी कोरोनाची लस टोचून घ्यावी यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
लोकांना रोगप्रतिबंधक लस टोचण्याकडे आकर्षित करण्यासाठी, रशियामधील कोरोनाव्हायरस लसीकरण केंद्राने आता एक छान गोड संकल्पना सुरू केली आहे! विशेष म्हणजे, ब्लूमबर्गच्या अहवालानुसार मॉस्कोच्या रेड स्क्वेअरवरील मॉल मधील लोकांना मोफत आईस्क्रीम देऊन प्रोत्साहनपर लस घेण्याचे आवाहन केलं जात आहे.
ब्लूमबर्गशी बोलताना लसीकरण केंद्राच्या प्रमुख डॉक्टर नताल्या कुजेंटोव्हा म्हणाल्या की, '' काल आमच्याकडे 35 जणांची रांग होती, परंतु गर्दी वाढत आहे आणि सध्या हवामान आमच्या येथे अनुकूल नाही, मॉलमध्ये दररोज सुमारे 300 लोकांना लसी दिली जाते.'' एका रिपोर्टनुसार रशियातील मॉस्को हे अशा ठिकाणांपैकी एक आहे. जिथं स्पुतिनिक व्ही लसीचा पुरवठा जास्त प्रमाणात केला जात आहे. लय भारी! मुळच्या भारतीय जोडप्यानं साडी अन् धोतर घालून केलं स्कीइंग; पाहा भन्नाट व्हिडीओ
नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार, केवळ 38% रशियन लोक स्पुतनिक व्ही घेण्यास तयार आहेत. म्हणूनच नागरिकांना लस घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या उपयांचा अवलंब केला जात आहे. सध्या रशियामध्ये दररोज सुमारे 66,000 लसीच्या डोसचा वापर होत आहे. माहिती विश्लेषकांच्या मते, देशाला खरोखरच मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यास काही महिने लागतील. माणुसकीला सलाम! रस्त्यावर स्टॉल लावून भुकेलेल्यांना मोफत अन्न पुरवणारी 'ती' अन्नदाता