बाबो! बिहारमध्ये झालेल्या 'या' परीक्षेत सनी लिओनीने केल टॉप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 16:04 IST2019-02-20T16:03:31+5:302019-02-20T16:04:09+5:30

सनी लिओनी ही नेहमीच तिच्या हॉट फोटोमुळे किंवा बोल्ड सीनमुळे चर्चेत असते.

Sunny Leone tops phed bihar junior engineer exam, scores 98.5 points check full merit list | बाबो! बिहारमध्ये झालेल्या 'या' परीक्षेत सनी लिओनीने केल टॉप!

बाबो! बिहारमध्ये झालेल्या 'या' परीक्षेत सनी लिओनीने केल टॉप!

सनी लिओनी ही नेहमीच तिच्या हॉट फोटोमुळे किंवा बोल्ड सीनमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. सनी लिओनीचं नाव बिहार 'ज्यूनिअर इंजिनिअर' च्या मेरीट लिस्टमध्ये टॉपवर आहे. त्यामुळे आता तिचे चाहते हैराण आहेत की, सनी आता काय इंजिनिअर म्हणूण नोकरी करणार? पण असं जर काही तुमच्याही डोक्यात येत असेल तर घाई करू नका. कारण ही सनी लिओनी बॉलिवूडवाली नाहीये.

रिपोर्टनुसार, 'बिहार पब्लिक हेल्थ इंजिनिअरींग डिपार्टमेंट'(PHED) ने ज्यूनिअर इंजिनिअर(सिव्हील) ची परिक्षा आयोजित केली होती. जी २१४ रिक्त पदांसाठी जानेवारीमध्ये घेतली गेली होती. आता या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालाने सोशल मीडिया यूजर्सना चांगलाच धक्का दिलाय. 

या निकालात सनी लिओनीने परीक्षेत ९८.५ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. ही परीक्षा देणारी सनी बॉलिवूड अभिनेत्री नाही तर वेगळी आहे. या परीक्षेत टॉप करणाऱ्या महिला उमेदवाराचं नाव सनी लियोनी आहे. हा केवळ एक योगायोग आहे. अभिनेत्री सनीने परिक्षा दिली नाही. 

२१४ रिक्त पदांसाठी काढण्यात आलेल्या भरतीसाठी १७९९१ लोकांनी अर्ज केले होते. या लिस्टमध्ये सनी लिओनीच्या नावाव्यतिरिक्त आणखी एका नावाने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. हे नाव आहे bvcxzbnnb. या उमेदवाराने परीक्षेत तिसका क्रमांक मिळवला आहे. 

Web Title: Sunny Leone tops phed bihar junior engineer exam, scores 98.5 points check full merit list