VIDEO : समुद्रात २० वर्षांनी दिसला अनोखा जीव, व्हिडीओ पाहून अवाक् झाले लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 06:43 PM2022-01-20T18:43:33+5:302022-01-20T18:51:21+5:30

Blanket Octopus : क्वींसलॅंडच्या टूरिज्म आणि इव्हेंट्ससाठी एक कटेंट क्रिएटर म्हणून काम करणारी शेकलटन लगेच तिच्या इन्स्टाग्रामवर ब्लॅंकेट ऑक्टोपसचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. 

Such unique creature appeared in the sea after 20 years people stunned to see the video | VIDEO : समुद्रात २० वर्षांनी दिसला अनोखा जीव, व्हिडीओ पाहून अवाक् झाले लोक

VIDEO : समुद्रात २० वर्षांनी दिसला अनोखा जीव, व्हिडीओ पाहून अवाक् झाले लोक

googlenewsNext

या महिन्याच्या सुरूवातीला जॅसिंटा शॅकलटन (Jacinta Shackleton) त्या मोजक्या लोकांपैकी एक झाली आहे ज्यांनी ब्लॅंकेट ऑक्टोपस (Blanket Octopus) बघितला. समुद्री अभ्यासक शेकलटन ग्रेट बॅरिअर रीफमध्ये लेडी एलियट आयलॅंड कोस्टजवळ स्नॉर्कलिंग करत होती. त्यावेळी तिला हा टेक्नीकलर जीव दिसला. क्वींसलॅंडच्या टूरिज्म आणि इव्हेंट्ससाठी एक कटेंट क्रिएटर म्हणून काम करणारी शेकलटन लगेच तिच्या इन्स्टाग्रामवर ब्लॅंकेट ऑक्टोपसचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. 

तिने 'द गार्डियन'ला सांगितलं की, 'जेव्हा मी पहिल्यांदा हा जीव पाहिला तर मला वाटलं की, हा लांब पंखांची एक मासा असू शकतो. पण जसा तो जवळ आला मला जाणीव झाली की, हा जीव एक मादा ब्लॅंकेट ऑक्टोपस आहे आणि ते समजल्यावर मला फार आनंद झाला'. ती म्हणली की, 'वास्तविक जीवनात अशा जीवाला जवळून बघणं फार वेगळा अनुभव आहे. मी त्याच्या हालचालीने इतकी मोहीत झाली होती की, जणू तो जीव पाण्यात नाचत आहे. रंग इतका अविश्वसनीय आहे की, तुम्ही डोळे बंद करू शकत नाही. मी प्रत्यक्षात कधीच असं काही बघितलं नाही आणि मला वाटतं की, असं काही मला पुन्हा बघायला मिळणारही नाही'.

ग्रेट बॅरिअर रीफमध्ये तीन वर्षापासून समुद्री जीवनाचं डॉक्युमेंटेशन करत असलेली शेकलटन म्हणाली की, ब्लॅंकेट ऑक्टोपसला याआधी केवळ तीनदा बघण्यात आलं आहे. द न्यूझीलॅंड जर्नल ऑफ मरीन अॅन्ड फ्रेशवॉटर रिसर्चनुसार, ब्लॅंकेट ऑक्टोपस फारच दुर्मीळ आणि सुंदर आहे. मादा ब्लॅंकेट ऑक्टोपस सहा फूटापर्यंत वाढू शकते. केवळ मेल ऑक्टोपस २.४ सेंटीमीटरपर्यंत वाढू शकतात. तर मादाचं वजन नराच्या तुलनेत ४० हजार पटीने जास्त असतं.
 

Web Title: Such unique creature appeared in the sea after 20 years people stunned to see the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.