समाजातील अनेक रूढी आणि परंपरांना मोडून तसंच चाकोरीबद्ध जगण्याच्या बाहेर जाऊन पृथिका यशिनीने हिने आपल्या जीवनात बदल घडवून आणला आहे. पृथिका ही पोलीस दलात भरती झालेली पहिली ट्रांसजेंडर महिला आहे. पृथिका तामिळनाडू पोलीसांपैकी एक पोलीस अधिकारी आहे. पृथिकाचा जन्म मुलगा म्हणून झाला होता. त्यानंतर नाव सुद्धा तसंच ठेवण्यात आलं. हिचे नाव प्रदिपकुमार असं नाव ठेवण्यात आले. पण तीला काहीतरी वेगळचं जाणवत होतं. ती मुलगा आहे हे स्वीकारणं तीला कठिण जातं होतं. सेक्स चेन्ज सर्जरीनंतर प्रदिपकुमारचे पृथिकात रुपांतर झाले. 

Image result for prithika yashini

तिच्या आईवडीलांनी शरमेने तिच्यासोबत राहणे सोडून दिलं होतं. माध्यमांनी दिलेल्या माहितीनूसार जेव्हा तिच्या आई- वडीलांना ती ट्रांन्सजेंडर असल्याचं कळलं  त्यानंतर त्यांनी तिच्यासोबत राहणं सोडून दिलं.

Image result for prithika yashini
तिचे पहिले एप्लिकेशन रिजेक्ट

पृथिकाने सगळ्यात पहिलं एप्लिकेशन दिेलेलं तेव्हा ते रिक्रुटमेंट बोर्डाकडून कॅन्सल करण्यात आलं. कारण त्या फॉर्मच्या जेंडर कॉलममध्ये तीन ऑप्शन नव्हते. ट्रांन्सजेंडरसाठी कोणतीही लिखीत, फिजीकल  परिक्षा तसंच इंटरव्ह्यूसाठी कोणत्याही अटी नव्हत्या. या सगळ्यांना अडचणींना सामोरे जात असताना सुद्धा पृथिकाने हार मानली नाही. 

Related image
 

पृथिकाची कोर्टात याचिका

Image result for prithika yashini

पृथिकाला पोलीस ऑफिसर बनण्यासाठी अनेकदा कोर्टाचे दरवाचे  ठोठोवण्याची पाळी आली. त्यानंतर या परिक्षेचा कटऑफ २८.५ वरून २५  करण्यात आला मग पृथिका प्रत्येक टेस्टमध्ये पास झाली. १०० मीटरची दौड तीने एका सेकंदात पार केली. नंतर पृथिकाला तामिळनाडू पोलीस दलात  भरती करण्यात आले. 

Web Title: Success story of Pruthika yashini is the first transgender police officer in the india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.