हे आहे जगातलं सगळ्यात महागडं रेस्टॉरंट, जेवणाचं बील बघूनच येईल चक्कर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 16:11 IST2023-04-13T16:10:51+5:302023-04-13T16:11:02+5:30
Most Expensive Restaurant In World : आम्ही तुम्हाला ज्या रेस्टॉरंटबाबत सांगत आहोत ते जगातलं सगळ्यात महागडं रेस्टॉरंट असून त्याचं नाव सल्बीमोशन आहे.

हे आहे जगातलं सगळ्यात महागडं रेस्टॉरंट, जेवणाचं बील बघूनच येईल चक्कर!
Most Expensive Restaurant In World : चांगलं खाणं आणि कुणाला डेटवर न्यायचं असेल तर कुणालाही एका चांगल्या रेस्टॉरंटची गरज असते. आज आम्ही तुम्हाला एका रेस्टॉरंटबाबत सांगणार आहोत ज्याचं इंटेरिअर कमाल आहे. आता जर इथे सगळं काही परफेक्ट असेल तर नक्कीच इथे बिलही जास्त येत असेल. आम्ही तुम्हाला ज्या रेस्टॉरंटबाबत सांगत आहोत ते जगातलं सगळ्यात महागडं रेस्टॉरंट असून त्याचं नाव सल्बीमोशन आहे.
किती येतं बील?
जगातलं हे सगळ्यात महागडं रेस्टॉरंट सब्लीमोशन स्पेनमध्ये आहे. इथे नॉर्मल पदार्थ खाल्ले तरी तुमचं बील साधारण 2 हजार डॉलर म्हणजे भारतीय करन्सीनुसार 1 लाख 63 हजार रूपये इतकं येतं. कधी कधी तर बील यापेक्षा जास्तही येऊ शकतं. सब्लीमोशन रेस्टॉरंट स्पेनमधील इबिसा आयलॅंडवर आहे. इथे बसल्यावर तुम्हाला तुममच्या मनासारखा नजारा बघायला मिळतो. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार इथे अंतराळाच्या फिलमध्ये डिनर करू शकता किंवा समुद्राखाली मास्यांसोबत तुम्ही लंच करू शकता. या रेस्टॉरंटचं केवळ इंटेरिअरच नाही तर येथील लाइट आणि साउंडही कमाल आहे.
खास डिझाइन करण्यात आलं आहे सब्लीमोशन
हे रेस्टॉरंट एका विशाल एक्वेरिअममध्ये तयार करण्यात आलं आहे आणि हे अशा कस्टमरसाठी तयार करण्यात आलं आहे ज्यांना जेवणासोबत अॅडव्हेंचरची आवड आहे. येथील कस्टमर सांगतात की, या रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्यावर तुम्ही येथील आठवणी कधीच विसरू शकत नाहीत. इथे येणं एक वेगळाच अनुभव देतं.