चुकीला माफी नाही! १८०० कोटींची लॉटरी जिंकली होती १९ वर्षीय विद्यार्थीनी, पण एक चूक पडली महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 03:23 PM2021-03-02T15:23:31+5:302021-03-02T15:37:50+5:30

ब्रायटन यूनिव्हर्सिटीमध्ये अंडर ग्रॅज्युएटचं शिक्षण घेणारी रेचल केनेडी दर आठवड्याला एकच नंबर खेळत होती आणि याच आठवड्यात तिचा नंबरवर जॅकपॉट लागला होता.

A student in England won 182 pound million dollars but she forgot to buy the ticket | चुकीला माफी नाही! १८०० कोटींची लॉटरी जिंकली होती १९ वर्षीय विद्यार्थीनी, पण एक चूक पडली महागात!

चुकीला माफी नाही! १८०० कोटींची लॉटरी जिंकली होती १९ वर्षीय विद्यार्थीनी, पण एक चूक पडली महागात!

Next

इंग्लंडमध्ये १९ वर्षीय एका विद्यार्थीनीचं संपूर्ण आयुष्य बदलणार होतं. पण एका चुकीमुळे तिला मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागला. या तरूणीने १८१ मिलियन पाउंड्स म्हणजे जवळपास १८०० कोटी रूपयांचा जॅकपॉट जिंकलाच होता. पण तिच्यासोबत एक ट्रॅजेडी झाली. 

ब्रायटन यूनिव्हर्सिटीमध्ये अंडर ग्रॅज्युएटचं शिक्षण घेणारी रेचल केनेडी दर आठवड्याला एकच नंबर खेळत होती आणि याच आठवड्यात तिचा नंबरवर जॅकपॉट लागला होता. हर्टफोर्डशायरमध्ये राहणारी रेचल केनेडी म्हणाली की, तिला जेव्हा हे समजलं तेव्हा ती आनंदाने नाचत होती. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण रेचलने या आठवड्यात तिकीट खरेदीच केलं नाही. (हे पण वाचा : क्या बात! केवळ १०० रूपयात बदललं महिलेचं नशीब, रातोरात बनली कोट्याधीश...)

रेचल म्हणाली की, ती यूनिव्हर्सिटीतील कामाबाबत फार बिझी होती आणि याच कारणाने तिच्या डोक्यातून वीकली लॉटरी तिकीट खरेदी करण्याचं राहून गेलं. रेचलचा बॉयफ्रेन्ड लियामने ट्विटरवर याबाबत खुलासा केलाय. त्याने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले की, जेव्हा तुमची गर्लफ्रेन्ड यूरो मिलियन ना खेळण्याचा निर्णय घेते आणि तिची लॉटरी लागते.

लियामने या ट्विटसोबत आणखी एक ट्विट केलं होतं. या फोटोत रेचेलचं ते तिकीट बघितलं जाऊ शकतं जे तिने गेल्या आठवड्यात खरेदी केलं होतं आणि याच लॉटरीवरही तेच नंबर आहेत जे जॅकपॉटसाठी लकी नंबर ठरले. दरम्यान फ्रायडे यूरोमिलियन्स जॅकपॉट मिळवण्यात स्वित्झर्लॅडच्या एका व्यक्तीला मिळाला. (हे पण वाचा : नशीब चमकलं! खोदकाम करताना सापडले दोन किंमती हिरे, मजुरांची आर्थिक परिस्थिती बदलणार...)

रेचलने लॅड बायबलसोबत बोलताना सांगितले की, मला वाटतं जगात जे काही घडतं त्यामागे काहीना काही कारण असतं. मला आशा आहे की, ज्यांनी ही लॉटरी जिंकली असेल त्यांना या पैशांची खूप गरज असेल. मला लॉटरी लागली नाही हे निराशाजनक आहे. पण हे मी लवकरच विसरून जाणार.
 

Web Title: A student in England won 182 pound million dollars but she forgot to buy the ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.